गोंदिया जिल्हातील काशिघाट येथे महाराष्ट्र राज्य रोजंदारी मजदूर सेनेची जाहीर सभा संपन्न. अदानी वीज केंद्रातील कामगारांना कायदेशीर हक्क मिळऊन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…. भाई चैनदास भालाधरे…
सदानंद पि.देवगडे(चंद्रपूर)
(वि. प्र. जी. एम. भालेराव ) गोंदिया जिल्हा तिरोडा विज केंद्रातील रोजंदारी मजदूर सेना शाखा तिरोडा चे वतीने 20 ऑक्टोबर 2023 रोजी काशिघाट या ठिकाणी जाहीर कामगार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करणारे भाई चैनदासजी भालाधरे आपले अध्यक्ष भाषणातून मार्गदर्शन करीतांना ते म्हणाले कि, शासनाचे प्रचलित वेतन व कायदेशीर देय्य देणी नुसार अदानी वीज केंद्रातील कंत्राटी कामगार कायदेशीर हक्कापासून वंचित असून यापुढे उपेक्षित कामगारांचा न्यायिक लढा संघटना उभारेल असा इशारा भाई चैनदासजी भालाधरे यांनी दिला. अदानी वीज केंद्रातील कामगारांवर अदानी व्यवस्थापन व कंत्राटदार यांचेकडून सातत्याने शोषण व पिळवणूक होत असून ही बाब कामगार कायद्याच्या दृष्टीने फारच गंभीर आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर संघटना संबंधित कार्यालयात कायदेशीर कारवाई करून संबंधितांकडे होत असलेल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यास पाठपुरावा करणार व कामगारांना न्याय मिळवून देणार अशी आक्रमक भूमिका रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदासजी भालाधरे यांनी मांडली. यापुढे कामगारांवर होत असलेला अन्याय कदापी सहन केल्या जाणार नाही, प्रसंगी संघटना लोकशाही मार्गाने येत्या काही दिवसातच तिरोडा अदानी वीज केंद्राच्या गेट समोर जहाल आंदोलन करेल असा रोखठोक सवाल भाई चैनदासजी भालाधरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. रोजंदारी मजदूर सेना ही संघटना तमाम कामगारांना न्याय देणारी संघटना आहे कामगारांना कायदेशीर हक्क मिळणे हा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे. कंत्राटदार प्राप्त वर्क ऑर्डरनुसार नियम व सेवा शर्तीचे अनुपालन करीत नसेल तर अशा कंत्राटदारावर रोजंदारी मजदूर सेना कारवाई करण्यात पुढाकार घेईल असे आव्हान रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जी. एम. भालेराव यांनी उपस्थित कामगार बांधवासमोर केले. कामगारांनी एकजुटीने आपल्या हक्क अधिकारासाठी समोर आले पाहिजे, जर कामगारांवर कंत्राटदार आणि व्यवस्थापन अन्याय करीत असेल तर संघटितपणे लढले पाहिजे. रोजंदारी मजदूर सेना तुमच्यासोबत खंबीरपणे साथ सहयोग देण्यास तयार आहे असे प्रभावी विचार संघटनेचे संस्थापक सदस्य भाई मनोज घरडे यांनी व्यक्त केले. अन्याय होत असेल तर आंदोलन करा आम्ही आंदोलनकारी आहोत. कामगारांनीभयभीत होऊ नये. आपण वीज केंद्रात अत्यंत जोखमीचे काम करीत आहात, तेव्हा आपल्या कामाचा मोबदला आपणास मिळालाच पाहिजे. जर कंत्राटदार जुलूम व अन्याय करत असतील तर त्यासाठी आम्ही तुमच्या सोबतीला राहून कायदेशीर आंदोलन करू असेआस्वस्थ रोजंदारी मजदूर सेना विदर्भअध्यक्ष भाई महेंद्र बागडे यांनी केले. नियमानुसार कामगारांना वेतन स्लिप व विविध भत्त्यांचा पगार मिळाला पाहिजे याकरिता संघटना प्रयत्नशील राहील. त्यासाठी आपण धाडसाने सामोरे आले पाहिजे असं कायदेशीर वक्तव्य संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भाई सदानंद जी देवगडे यांनी केले रोजंदारी मजदूर संघटना कामगारांना न्याय देऊ शकते कारण ही संघटना कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही, हा संघटनेचा आजवर चा इतिहास आहे असे महत्त्वपूर्ण भाष्य चंद्रपूर जिल्हा संघटक भाई दिवाकरजी डबले यांनी केले तसेच कामगार नेते दिवंगत भाई बाबू भालाधरे यांचे क्रांतिकारी जीवनावर डबलेजी यांनी प्रेरणादायी गीत गायले.
साप्ताहिक ग्राम रक्षक अमरावती चे संपादक सन्माननीय वाय. एम. रामटेकेजी यांनी देखील कामगारांच्या हिताकरिता व न्यायासाठी शासन दरबारी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज बुलंद करू असे प्रखर मत मांडले. संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष भाई अनिल बोरकर संघटनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भाई अमित पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्प माला अर्पित करण्यात आले. याप्रसंगी तिरोडा येथील वीज केंद्रातील रोजंदारी मजदूर सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तमाम कामगार सदस्य बांधवांनी आपले विचार प्रस्तुत केले. या जाहीर कामगार सभेला कामगार बांधवांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवून ऐतिहासिक कामगार सभा यशस्वी केली. सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जी.एम.भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन शाखा पदाधिकारी यांनी केले. शेवटी सर्व कामगार बांधवानी सहभोजन घेऊन सभा समाप्त झाली.