BREAKING NEWS:
हेडलाइन

गोंडवाना विद्यापीठासाठी ९ हजार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या मंजूर

Summary

गडचिरोली जिल्हा वार्ता : राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अनुदानित महाविद्यालयांना नियमित कार्यक्रम व विशेष शिबिरे आयोजित करावी लागतात. यासाठी शासनातर्फे दरवर्षी विद्यार्थिसंख्या मंजूर करण्यात येते. यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयासाठी ९ हजार […]

गडचिरोली जिल्हा वार्ता :
राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अनुदानित महाविद्यालयांना नियमित कार्यक्रम व विशेष शिबिरे आयोजित करावी लागतात. यासाठी शासनातर्फे दरवर्षी विद्यार्थिसंख्या मंजूर करण्यात येते. यावर्षी गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयासाठी ९ हजार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या मंजूर करण्यात आली आहे.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयातील ९ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये राष्ट्रीय सेवा योजने मध्ये सहभागी होता येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 20 ऑक्टोंबर 2020 रोजी च्या परिपत्रकात नमूद केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अनुदानित महाविद्यालयांना नियमित कार्यक्रम व विशेष शिबिरे घ्यावी लागतात यासाठी शासनातर्फे दरवर्षी विद्यार्थिसंख्या मंजूर करण्यात येते. सन २०२० – २१ या वर्षाकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जातीसाठी 11.8 टक्के अनुसूचित जमातीसाठी 9.4 टक्के व इतरांसाठी 78.8 टक्के अशी विभागणी केली आहे.
यानुसार गोंडवाना विद्यापीठासाठी ९हजार विद्यार्थ्यांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1060, अनुसूचित जमातीसाठी 2020, इतर 5920 व विशेष शिबिरासाठी 4500 शिबिरार्थीची संख्या मंजूर करण्यात आली आहे. विद्यापीठाने त्यांना मंजूर केलेल्या विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या घेऊ नये. वाटप केलेल्या विद्यार्थी संख्येचे त्यांना संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना प्रवर्गनिहाय वाटप करावे व त्याची प्रत शासनास पाठवावी. विद्यापीठांनी प्रत्यक्षात नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शासनाला दिनांक 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कळवावी असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढून कळविले आहे.
प्रा. शेषराव येलेकर
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *