नागपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

“गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही!” कामांमध्ये पारदर्शकतेचा आग्रह – आमदार ठाकूर यांचा कंत्राटदारांना इशारा काटोल विधानसभा क्षेत्रातील १२ गावांमध्ये सव्वा पाच कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Summary

कोंढाळी/काटोल (प्रतिनिधी) – काटोल विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये आरोग्य सेवा केंद्र, नागरी सुविधा, रस्ते व पायाभूत सुविधांच्या सव्वा पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आमदार ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत “बांधकामात गैरप्रकार खपवून […]

कोंढाळी/काटोल (प्रतिनिधी) –
काटोल विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये आरोग्य सेवा केंद्र, नागरी सुविधा, रस्ते व पायाभूत सुविधांच्या सव्वा पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आमदार ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत “बांधकामात गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही” असा सज्जड इशारा संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिला.

सावरगाव येथे ५० लाखांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय अंबाडा देशमुख, बानोर पिठोरी, खरसोली, खैरगाव, तीनखेडा, रोहणा, वडविहिरा, थडिपवनी, दावसा, रामठी या गावांमध्ये आरोग्य सेवा उपकेंद्रांच्या इमारतींचे, तसेच मेंढला येथे जनसुविधा अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमांना संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विभागीय वरिष्ठ अधिकारी, व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आमदार ठाकूर म्हणाले, “या कामांमध्ये दर्जा व गुणवत्ता अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांनी कामे नियोजित वेळेत आणि उत्तम दर्जात पूर्ण करावीत.”

त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी कामांवर सतत लक्ष ठेवावे. हे काम केवळ विकासाचे नाही, तर जनतेच्या विश्वासाचे आहे.”

याप्रसंगी उकेश चव्हाण,प्रवीण लोहे, पार्वताताई कालबांडे, , नरेश
अरसडे, सतीश रेवतकर, मनीष फुके संजय कामडे, दिनेश चाफले सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *