BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा विद्यार्थ्यांना यशाची दस सुत्री अतिरिक्त आयुक्त डाक्टर कमल किशोर फुटाणे

Summary

कोंढाळी वार्ताहर -: शाळा महाविद्यालये ही फक्त ज्ञानाचे मंदिर नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याची पायरी आहे. कला, क्रीडा आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांतून विद्यार्थी स्वतःला शोधतात, जिद्द, शिस्त आणि संस्कार आत्मसात करतात. याच भावनेतून आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेतील […]

कोंढाळी वार्ताहर -: शाळा महाविद्यालये ही फक्त ज्ञानाचे मंदिर नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्याची पायरी आहे. कला, क्रीडा आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांतून विद्यार्थी स्वतःला शोधतात, जिद्द, शिस्त आणि संस्कार आत्मसात करतात. याच भावनेतून आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून अतिरिक्त आयुक्त डॉ. कमल किशोर फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. त्यांच्या प्रभावी भाषणाने संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने भारावून गेला.
यशाची दससूत्री आवश्यक – डॉ. फुटाणे
स्व. सुभाष राठी स्मृती प्रित्यर्थ लाखोटिया भुतडा विद्यालयाच्या प्रांगणात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२५-२०२६ चा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई राठी, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कमलकिशोर फुटाणे (उपआयुक्त, नागपूर) उपस्थित होते. प्राचार्य सुधीर बुटे, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, उपमुख्याध्यापक कैलास थूल, पर्यवेक्षक मनोज ढाले, हरीश राठी, परीक्षा विभाग प्रमुख सुनील सोलव, प्रिया धारपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फुटाणे यांचे ‘यशस्वी होण्यासाठी दससूत्री मार्गदर्शन’
मुख्य अतिथी डॉ. फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पुढील दहा सूत्रे दिली :
1. लवकरात लवकर करिअर निवडा
2. आपली क्षमता ओळखा
3. आंतरिक प्रेरणा शोधा
4. सुरू असणारा अभ्यास महत्त्वाचा आहे
5. फाउंडेशन मजबुत करा
6. अयशस्वी व्यक्तीकडूनही सल्ला घ्या
7. प्रत्येक कृती अभ्यासाशी निगडित ठेवा
8. वेळेचे योग्य व्यवस्थापन करा
9. सातत्य ठेवा
10. आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन जोपासा
त्यांनी सांगितले – “स्पर्धा परीक्षेत टिकायचं असेल तर अभ्यासासोबतच आत्मशिस्त आणि ध्येय निश्चय हाच यशाचा खरा मंत्र आहे.”
ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.
सर्वसामायिक प्रथम बक्षीस –
वेदांत दामोदर उईके (इ.१२ वी विज्ञान अ) : टॅब, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

गट अ (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम – रिशु सुनील पाल (इ.७ वी ब)
द्वितीय – कु. स्वरा हर्षल देवतळे (इ.६ वी ड)
तृतीय – कु. मिस्टी ओमप्रकाश बागडे (इ.६ वी ड)
प्रोत्साहन – कु. संकष्टी विनोद ठवकर (इ.५ वी ड), मयुरेश नितीन हिवसे (इ.६ वी ड)
गट ब (इ. ८ वी ते १० वी)
प्रथम – कु. धनश्री रवींद्र चोपडे (इ.१० वी क)
द्वितीय – उज्वल रवींद्र झाडे (इ.१० वी ई)
तृतीय – अश्विन विनोद क्षीरसागर (इ.१० वी ई)
प्रोत्साहन – कु. रिया धनराज कुंभरे (इ.१० वी ड), कु. प्रणाली प्रकाश चापले (इ.९ वी ड)
गट क (कनिष्ठ महाविद्यालय – इ.११ वी व १२ वी)
प्रथम – संस्कार गणेश माळोदे (इ.११ वी कला ब)
द्वितीय – कु. भावेश्री नामदेव शेंडे (इ.११ वी विज्ञान अ)
तृतीय – हिमांशू नरेंद्र मस्के (इ.११ वी विज्ञान अ)

प्रोत्साहन – सौरभ प्रदीप भुरे (इ.११ वी विज्ञान अ), प्रतीक मोरेश्वर पांडे (इ.१२ वी विज्ञान ब), तनिष्क ब्रिजेश तिवारी (इ.१२ वी विज्ञान ब), प्रणय किशोर टोपले (इ.१२ वी विज्ञान ब)

सर्व विजेत्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक संच, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अनंता बुरान यांनी केले तर आभार अमोल काळे यांनी मानले.
परीक्षा विभाग प्रमुख सुनील सोलव यांच्या मार्गदर्शनाखाली अनंता बुरान, रुपेश वादाफळे, महेश घोगरे, प्रवीण गांजरे, प्रमोद इंगुलवार, प्रांजली मस्की, संध्या भुते, सोनाली ठवळे, मोहिनी भक्ते, अमोल काळे, हर्षवर्धन ढोके, हर्षल वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

ध्वनीव्यवस्था समीर लोणारे व शुभम राऊत, तर एनसीसी विभागाचे ज्ञानेश्वर भक्ते व श्याम धीरन यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
*क्षण चित्र*
1. “यशस्वी होण्यासाठी दससूत्री – डॉ. फुटाणे यांचे मार्गदर्शन”

2. “लाखोटिया भुतडा विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा विजेत्यांचा गौरव”

3. “वेदांत उईकेला सर्वसामायिक प्रथम क्रमांक – टॅब व सन्मानचिन्ह प्रदान”

4. “विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पालकांच्या डोळ्यांत अभिमान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *