गुढी भगव्या पताक्याचीच का? डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले अनेक प्रश्न
Summary
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १४ एप्रिल २०२१ गुढीपाडव्याचे उल्लेख संतसाहित्यात आहेत, आजची जी ‘साड़ी-चोळी-बांबू-आणि पालथा तांब्या’ या स्वरूपाचा उल्लेख कोणत्याही साहित्यात नाही.गुढीपाडवा हा जर हिंदूचा सण असेल तर मग महाराष्ट्राबाहेर गुढ्या का उभारल्या जात नाहीत ? महाराष्ट्राबाहेर हिंदू राहत […]
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १४ एप्रिल २०२१
गुढीपाडव्याचे उल्लेख संतसाहित्यात आहेत, आजची जी ‘साड़ी-चोळी-बांबू-आणि पालथा तांब्या’ या स्वरूपाचा उल्लेख कोणत्याही साहित्यात नाही.गुढीपाडवा हा जर हिंदूचा सण असेल तर मग महाराष्ट्राबाहेर गुढ्या का उभारल्या जात नाहीत ? महाराष्ट्राबाहेर हिंदू राहत नाहीत काय ? आजच्या स्वरूपातील गुढ्या महाराष्ट्रातच का ? तर हे सनातनीपुरूषसत्ताकसत्रीदास्य गुलामगिरीचे प्रतिक आहे.
छत्रपती संभाजीराजे शूर,पराक्रमी, स्वाभिमानी, सुंदर आणि बुद्धिमान होते. असे समकालीन अबे करे म्हणतो. ते सनातन्यांच्या इशाऱ्यावर चालणारे नव्हते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले. त्यापैकी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ आहे. पण भांडारकरी भटांनी मूळ बुधभूषन नष्ट करून ब्राम्हणी चोपडे समोर आणले आहे, असे शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित म्हणतात. संभाजीराजांना ठार मारण्याचा मंत्र्यांनी तीन वेळा प्रयत्न केला. शेवटी औरंगजेबाद्वारे सनातन्यांनी संभाजीराज्यांची हत्या केली. सर्व धर्मातील कडवे आतून एकच असतात. सनातनी आणि औरंगजेब यांनी संगनमताने संभाजी राजांची हत्या केली. शिवरायांची बदनामी करण्यासाठी लेन वापरला, तसे संभाजीराजांची हत्या करण्यासाठी औरंगजेब वापरला. संभाजीराजांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवून धर्मक्षेत्रात सनातन्यांपुढे आव्हान उभे केले होते. त्यामुळे सनातन्यांनी त्यांचे जीभ,डोळे,कान,शरीर यांचे तुकडे करून त्यांची हत्या केली. धार्मिक क्षेत्रात आव्हान उभे करणारांची हत्या करणे, ही सनातन्यांची प्राचीन परंपरा आहे. उदाहरणार्थ.बळीराजा, सर्वज्ञ चक्रधर, संत तुकाराम महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलीकर,कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश इत्यादींची सनातनी व्यवस्थेनी केलेल्या हत्या ही त्याची उदाहरणे आहेत.जागतिक कीर्तीचे इतिहासकार अल्बेरूणी त्यांच्या *तहकिकात-ए हिंद* (११वे शतक) अभिजात ग्रंथात लिहीतात की, भारतात एखाद्या बहुजन व्यक्तीने संस्कृत भाषेवर प्रभुत्व संपादन केले तर सनातनी लोक त्या व्यक्तीची अत्यंत निर्दयपणे हत्या करतात.संस्कृत भाषा बोलली तर जीभ कापतात,संस्कृत ऐकले तर त्याच्या कानात तापलेले शिसे ओततात,संस्कृतकडे पाहिले तर त्याचे डोळे काढतात,संस्कृत भाषेत लेखन केले तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतात.अशी घडलेली घटना त्यांनी त्यांच्या जगविख्यात ग्रंथात नोंदवलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले होते.संस्कृत अध्ययन आणि लेखन देखील केले होते.त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ देखील लिहिला आहे. संभाजी महाराजांच्या हत्येमागे हे एक कारण आहे.प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात औरंगजेब हा मुसलमानामधील ब्राह्मण होता.तो क्रुर,निर्दयी होता.सनातन्याना अपेक्षित असणारी हत्या त्याने केली.संभाजीराजांच्या हत्येनंतर सनातन्यांना प्रचंड आनंद होणे स्वभाविक होते, कारण त्यांची ईच्छापुती झालेली होती.जसा छत्रपती प्रतापसिंह महाराज,शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या मृत्युनंतर सनातन्यांना आनंद झाला होता.याचे वर्णन प्रबोधनकार ठाकरे,थोर साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे इ .नी केलेले आहे.अगदी त्या प्रमाणेच! त्या आनंदाप्रीत्यर्थ म्हणूनच त्यानी पालथा तांब्या,साडी,चोळी,आणि त्यामध्ये बांबू अशा प्रतिकात्मक गुढ्या उभारायला सुरुवात केली.हे स्पस्ट होते.कारण आजच्या गुढीच्या स्वरूपाचे उल्लेख संत साहित्यात सापडत नाहीत. वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे. गौतम बुद्धाने भगव्या रंगाचे चीवर निवडले.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे.भगवा ध्वज ही भारताची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारताची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लावुन संभाजी महाराजांना अभिवादन करणे, घरावर भगव्या रंगाचा झेंडा हाच गुढीपाडवा आहे.