गारपीटी मुळे नुकसान झालेल्या पिकांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.21, तालुक्यातील घाटनांद्रा , आमठाणा , धारला या भागात रविवार ( दि.21 ) रोजी दुपारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला.यामुळे कांदा, गहू, मका इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीने नुकसान झालेल्या काही भागाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतातील बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शनिवार ( दि.20 ) रोजी ही तालुक्यातील सराटी , बोदवड इत्यादी भागात गारपीट झाली. तालुक्यासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस व गारपीट मुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून नेमकी किती नुकसान झाले हे समोर आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल असे स्पष्ट करीत चिंता करू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, अरुण ( बंडू ) पा.शिंदे, रफिक देशमख, कौतिकराव मोरे, सरपंच तुकाराम ढोके आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
शेख चांद