गांजा तस्कर करणाऱ्या दोन आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी भंडारा
गांजा सेवन व तस्करांवर सतत कारवाई सुरू असून दिनांक ०६-०५-२०२३ रोजी चे दुपारी दोन इसम होंडा डियो मोटर सायकलने वरठी कडून पांढरा बोडी रोडनी शुक्रवारी कडून भंडारा शहरात गांजा तस्करी करीत आहेत अशी गोपनीय खबर पोलीस निरीक्षक श्री नितीन कुमार चिंचवडकर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना प्राप्त झाल्यावर माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश देशमुख सहाय्यक फौजदार मडामे, पोलीस हवालदार प्रदीप डहारे पोलीस हवालदार किशोर मंगेश माळोदे पोलीस हवालदार अमोल खराबे यांचे पथक तयार करून एनडीपीएस च्या तरतुदीनुसार सुनियोजित सापळा रचून पांढरा बोडी रोड नी शुक्रवारी कडे येणाऱ्या रोडवर लपून नजर ठेवून सुमारे ०३ वाजून १५ मिनिटे वाजता दरम्यान होंडा डियो मोपेड दुचाकी मोटर सायकल क्रमांक MH36/U-2420 वर आरोपी १)अनमोल सुखदेव वाहने वय (४१) राहणारा वरठी, २) दिनेश राजू राठोड वय (३१) राहणारा आंबागड असे सापळा कारवाई मध्ये मिळून आले व होंडा डियो मोटरसायकलचे डिक्की मधून ०२.२४ किलो अमली पदार्थ गांजा की २०,२४० रुपयाच्या मिळून आल्याने मौका पंचनामा कारवाई करून मोपेड मोटर सायकलवर मोटरसायकल सह ०२.२४ किलो अमली पदार्थ गांजा की २०,२४० रुपये असा एकूण किंमत ४५,२४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपितां विरुद्ध एनडीपीएस प्रमाणे पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपी अटक आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री रोहित मतानी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा अशोक बागुल, श्री नितीन कुमार चिंचवडकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, सहाय्यक फौजदार मडामे, पोलीस हवालदार प्रदीप डहारे, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस हवालदार रमेश बेंदूरकर, पोलीस हवालदार विजय तायडे, पोलीस हवालदार निरंजन कडव, पोलीस नाईक अंकुश पुराम, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार योगेश ढबाले, पोलीस अंमलदार मंगेश माळोदे, पोलीस हवालदार अमोल खराबे सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केले.