क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

गांजा तस्करांनी केली पत्रकाराला मारहाण, गांजा तस्कर निघाले वरठी पोलिसांचे खबरी

Summary

प्रतिनिधी वरठी         दिनांक १४-११-२०२३ रोजी सायंकाळी ०५:२० वाजता अमर कॉम्प्युटर सेंटर, (आंबेडकर वॉर्ड, एकालारी रोड, वरठी) समोर गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव वय १९ वर्षे ने सुतळी बॉम्ब फोडला यावरून दुकान उघडतेवेळी पाठीमागे फोडला म्हणून लोकशक्ती […]

प्रतिनिधी वरठी

        दिनांक १४-११-२०२३ रोजी सायंकाळी ०५:२० वाजता अमर कॉम्प्युटर सेंटर, (आंबेडकर वॉर्ड, एकालारी रोड, वरठी) समोर गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव वय १९ वर्षे ने सुतळी बॉम्ब फोडला यावरून दुकान उघडतेवेळी पाठीमागे फोडला म्हणून लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर भालचंद्र वासनिक वय ३२ वर्षे हे दचकले त्यामुळे अमर वासनिक यांनी प्रस्तुत गांजा तस्कराला हटकले असता तस्कराने तुझ्या बापाची घेतली जागा होय का भांडण केले यावरून अमर वासनिक सोबत मयंक यादव ने हातापाई केली. सोबत विक्की साहुकार उर्फ विक्की अशोक गणवीर उपस्थित होता याने गांजा तस्कराला म्हंटले की याला खतम कर मी पाहून घेईन आणि प्रस्तुत गांजा तस्कर सुप्रिया दिनेश राठोड हिच्या घरी गेला आणि दोन धारदार लोखंडी शस्त्रे आणून दुकानाचे काच फोडले तसेच पत्रकार अमर वासनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला अमर वासनिक त्या मुलाच्या शस्त्रांचे वार हुकवित असताना खिशातील मोबाईल मुळे बचावले आणि धारदार शस्त्र अमर वासनिक यांच्या मांडीवर लागले. प्रस्तुत आत्मघाती हल्ला करणाऱ्या गांजा तस्कराचे नाव मयंक मुन्ना यादव असून. मयंक मुन्ना यादव हा आपल्या आईला घेऊन आला आणि पुन्हा दुकानातील काच फोडले व अमर वासनिक यांच्या दुकानात शिरून मारायच्या बेतात असताना लोकांनी त्याला अडवले. नंतर अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र कवडू वासनिक हे दुकानाकडे आले असता जमाव बघून तसेच फुटलेले काच बघून त्यांनी जमावाला प्रश्न केले काच कुणी फोडले. यावर मयंक मुन्ना यादव याची आई मोनी मुन्ना यादव म्हणाली काच मी फोडले तुला जे करायचे असेल ते कर यावर भालचंद्र कवडू वासनिक यांनी हटकले असता मोना गणवीर उर्फ मोना मुन्ना यादव भालचंद्र वासनिक यांच्या अंगावर चवताळली; म्हणून भालचंद्र वासनिक यांनी काही करू नये म्हणून अमर भालचंद्र वासनिक यांनी आपल्या बाबांना अर्थात भालचंद्र वासनिक यांना पकडुन ठेवले तर मोना गणवीर हिने भालचंद्र वासनिक यांच्या गालावर दोन झापडा मारल्या. आणि लोकांची जागा मारल्याचे खोटे आरोप करून अश्लील शिवीगाळ केली. यावर वरठी दवाखान्यात अमर वासनिक जावून आले आणि दोन इंजेक्शन लावल्या. आणि पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार करायला गेले असता मोनी गणवीर हि अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र वासनिक यांची खोटी तक्रार देत होती. वरठी पोलिसांनी दोंन्ही पक्षांवर गुन्हे दाखल केले आहेत. मयंक मुन्ना यादव तसेच त्याच्यासोबत असलेले मुले फरार आहेत.
घटनास्थळी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नयन ताराचंद शेंडे उपस्थित होते.
त्यानंतर अमर वासनिक यांची तक्रार झाल्यानंतर वरठी पोलीस अमर वासनिक यांना भंडारा शासकीय इस्पितळात घेऊन गेले अमर वासनिक यांच्या मांडीला टाके लागले. त्यानंतर अमर वासनिक यांना वरठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असता अमर वासनिक यांच्या आंबेडकर वॉर्ड स्थित घरावर लोखंडी धारदार शस्त्रे, विटा, दगड घेऊन मोनि गणवीर हीचे भाऊ तसेच गँग यांनी घराचा दरवाजा तोडायचा प्रयत्न केला व भालचंद्र वासनिक यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

प्रकरण असे आहे की आंबेडकर वॉर्ड वरठी येथील स्वर्गवासी प्रवीण गणवीर यांचे अशोक गणवीर, विक्की अशोक गणवीर, पंकज अशोक गणवीर हे वारसदार नसून ते वरठी येथील झोपडपट्टी मध्ये राहत होते आणि प्रवीण भाऊ गणवीर यांना जागेचा हिस्सा मागायला येत होते. परंतु स्वर्गवासी प्रवीण गणवीर हे अशोक विक्रम गणवीर यांना जागेचा हिस्सा द्यायला तयार नव्हते. नंतर प्रवीण भाऊ गणवीर यांना कावीळ – पिलिया झाला असता ते मरण पावले प्रवीण गणवीर नंतर त्यांचे वारसदार त्यांची पत्नी तसेच तिचे नवजात अभ्रक होते यातील नवजात अभ्रकाची हत्या विक्की अशोक गणवीर याने केली व प्रवीण भाऊ गणवीर यांच्या पत्नी ला हाकलून दिले त्यामुळे प्रवीण भाऊ गणवीर यांची वारसदार पत्नी हीचे मानसिक संतुलन बिघडले व ती रस्त्यावर फिरायला लागली. अशोक गणविर यांना ग्रामपंचायत वरठी येथून वारसान प्रमाणपत्र मिळत नाही आहे हे त्यामुळेच.
अशोक गणवीर, विक्की गनविर, पंकज अशोक गणवीर यांनी अमर वासनिक यांच्या वडिलांची अर्थात भालचंद्र कवळू वासनिक यांची जागा बळकावली आणि आणखी जागा बळकावण्याच्या तयारीत आहेत. व अमर कॉम्प्युटर सेंटर समोरून रस्ता जात असून त्या दुकासामोर रस्त्याच्या बाजूला नेहमी कचरा टाकत असतात. तसेच दिवाळी निमित्त मुद्दाम आपल्या घरासमोर बॉम्ब न फोडता अमर कॉम्पुटर सेंटर समोर सुतळी बॉम्ब फोडत असून दुकानासमोर पायरीवर रातोरात लहान मुलाची विष्ठा कागदा मध्ये गुंडाळून फेकत असतात. बॉम्ब दुकानासमोर फोडत असल्यामुळे दुकानाचे काच कंपन पावत असतात.
व बदी बदी पाय पसरवत असतात.

जागेचे वारसदार नसल्यामुळे अशोक विक्रम गणवीर जागा मोजायला टाकू शकत नाही कारण ग्रामपंचायत वरठी येथून अशोक गणविरला वारसान प्रमाणपत्र मिळत नाही आहे. त्यामुळे फेरफार मध्ये याची नावे अस्तित्वात नाही आहेत.

कुख्यात गांजा, हेरॉईन तस्कर दिनेश राजू राठोड हा तुरुंगात बंद असूनही वरठी येथील सूत्रे सांभाळत आहे. प्रस्तुत गांजा तस्करीचे कारभार मयंक मुन्ना यादव याच्याकडे सोपविले असून हे पोलिसांचे खबरी असल्याचे पोलीस योद्धा न्युज नेटवर्क च्या गोपनीय सूत्रांकडून माहीत झाले आहे. वरठी येथील हेड कॉन्स्टेबल रमेश श्रीराम माहुरले बॅच क्रमांक 743 यांनी पीडित पत्रकाराची एफ आय आर घेण्यास टाळाटाळ केल्याने रमेश श्रीराम माहूरले यांच्या मनमर्जीप्रमाने एफ आय आर नोंदविली गेली ज्यामुळे आरोपी गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव यास तत्काळ बेल मिळाली.

वरठी पोलिसांनी एफ आय आर क्र. 0242 दिनांक 15-11-2023 वेळ 12:01 am वाजता
केली असून आयपिसी 1860 अंतर्गत 324, 427, 504, 506 अंतर्गत केली आहे.
अमर भालचंद्र वासनिक हे पोलीस योद्धा न्युज नेटवर्क मध्ये न्युज एडिटिंग चे कार्य करतात.
तसेच लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेमध्ये प्रदेश महासचिव असून दिनांक १४-११-२०२३ दिवस अमर वासनिक यांचा दहशतीत गेला.
अमर वासनिक यांचा मर्डर करायचा प्रयत्न केल्यामुळे तसेच घरावर विटा, दगड, धारदार लोखंडी शस्त्रांचे हल्ले झाल्यामुळे अमर वासनिक यांचा परिवार हा दहशतीत आहे.

तरी प्रस्तुत प्रकरणाकरीता चौकशी करून कार्यवाही करण्याच्या हेतूने राजपत्रित अधिकारी यांची नियुक्ती करावी
अशी सेवेशी नम्र विनंती पत्रकार अमर यांनी मंत्रालयात सादर केली आहे.

वरठी येथील गांजा तस्कर यांनी पोलिसांच्या साहाय्याने लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेच्या कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा आणल्याने संघटनेचे ऑफिस पड़ले बंद.

दिनांक १४-११-२०२३ रोजी वरठी येथील गांजा, ब्राऊन शुगर, हेरॉईन तस्कर यांनी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे अधिकृत कार्यालय अमर कॉम्प्युटर सेंटर च्या ऑफिस ची तोडफोड केली (वेळ 05:25 pm)
तसेच रात्री वेळ 10:20 pm ला अमर भालचंद्र वासनिक
यांच्या निवासस्थानी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. गांजा तस्कर यांची गँग होती. २० मिनिटे दरवाजा समोर तोडफोड केली. गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव, झुलेलाल(गुलाब) गणवीर, विक्की साहूकार उर्फ विक्की अशोक गणवीर यांची गँग अमर वासनिक यांच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत होते. तेव्हा अमर वासनिक हे पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते.
प्रस्तुत प्रकरणाचे गांभीर्य ओळखताना पोलिसांचे खबरी गांजा तस्कर यांच्या सहाय्याने अमर कॉम्प्युटर सेंटर ला बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अमर कॉम्प्युटर सेंटर, आंबेडकर वॉर्ड, वरठी इथून लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे कार्यालयीन कामकाज चालत होते तसेच पोलीस योद्धा न्युज नेटवर्क चे कार्यालयीन कामकाज चालत होते.
करीता संबधित प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पत्रकार अमर वासनिक यांच्या वर झालेल्या पोलीस कार्यवाहीचा तपास राजपत्रित अधिकारी यांच्या हातात देण्यात यावा व प्रस्तुत प्रकरणामध्ये गुंतलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात येऊन खटला चालवण्यात यावा करीता सेवेशी विनम्र अर्ज पत्रकार अमर वासनिक यांनी मंत्रालयात सादर केले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश श्रीराम माहूर्ले हे एफ आय आर घ्यायला तयार नव्हते म्हणून त्यांच्या मनमर्जी प्रमाणे एफआययार वर स्वाक्षरी द्यावी लागली. तुषार बर्वे/जितेंद्र बर्वे पोलीस यांना अमर वासनिक यांचे वडील भालचंद्र वासनिक यांनी विचारले की आपण आरोपींना अटक का केली नाही. यावर तुषार बर्वे म्हणाले अमर चा मर्डर झाला असता तरच आम्ही अटक केली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *