BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

Summary

बुलडाणा | नवऱ्याने गावात पत्नीचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिखली तालुक्यात घडली असून याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायको घटस्फोट देत नसल्याने चक्क सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्याच बायकोचे पोस्टर्स लावून त्यावर गरज पडल्यास संपर्क […]

बुलडाणा | नवऱ्याने गावात पत्नीचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिखली तालुक्यात घडली असून याबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायको घटस्फोट देत नसल्याने चक्क सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्याच बायकोचे पोस्टर्स लावून त्यावर गरज पडल्यास संपर्क साधा, असं लिहिलं आहे. तसेच काही मोबाईल क्रमांकही यावर दिले असल्याचं कळतंय.
समाधान निकाळजे नामक आरोपीने हा प्रताप केला असून महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसात आरोपी विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी महिलेच्या भावाने या आरोपीसोबत फोनवर चर्चा केली असता चिखली तालुक्यात आरोपीने पोस्टर्स लावले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटस्फोट नाही दिला तर बायकोची बहीण व सासूचे सुद्धा पोस्टर्स लावून बदनामी करण्याची धमकी या विकृत आरोपीने दिली आहे.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *