BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

गरजू रुग्णांसाठी १००% नि:शुल्क ऑपरेशन व १००% निःशुल्क उपचार सेवा..! –डॉ. आशिष देशमुख

Summary

●काटोल-नरखेड तालुक्यांतील सोनोली, भिष्णूर, लाडगांव, खैरगांव, पुसागोंदी येथे केले नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन. ●पुसागोंदी येथे ४०८ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. कोंढाळी-वार्ताहर-  “महागड्या खाजगी वैद्यकीय सेवांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. काटोल-नरखेड क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्या लक्षात घेत वैद्यकीय उपचार सेवेपासून गरजू रुग्ण उपेक्षित […]

●काटोल-नरखेड तालुक्यांतील सोनोली, भिष्णूर, लाडगांव, खैरगांव, पुसागोंदी येथे केले नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन.
●पुसागोंदी येथे ४०८ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ.
कोंढाळी-वार्ताहर- 
“महागड्या खाजगी वैद्यकीय सेवांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. काटोल-नरखेड क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्या लक्षात घेत वैद्यकीय उपचार सेवेपासून गरजू रुग्ण उपेक्षित राहू नये म्हणून लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूरच्या माध्यमातून भव्य रोगनिदान, रुग्णभरती व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न असून अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या रुपात ग्रामीण भागातील रुग्णांना मदत करण्याची आपली इच्छा आहे. लता मंगेशकर हॉस्पीटल येथे जनरल वार्डमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांसाठी १००% नि:शुल्क ऑपरेशन व १००% निःशुल्क उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातूनसुद्धा रुग्णांना मदत करण्याचा आपला मानस असून सर्व प्रकारच्या रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निःशुल्क हृदय उपचार व हृदय शस्त्रक्रियासुद्धा लता मंगेशकर हॉस्पीटल, सीताबर्डी येथे करण्यात येत आहे. आजकाल डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. डेंग्यूचा फैलाव होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्यावेळी कोरोनाच्या गंभीर समस्येमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यावेळी काटोल-नरखेड क्षेत्रातील कोविडग्रस्त रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पीटलच्या माध्यमातून नि:शुल्क सेवा प्रदान करण्यात आली होती. कोरोनाच्या तिसऱ्या संभावित लाटेचा धोका बघता, प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेऊन मास्कचा वापर करावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. काटोल-नरखेड क्षेत्रातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर आहोत”, असे प्रतिपादन काटोल-नरखेडचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. दि. ०८ सप्टेंबर २०२१ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुसागोंदी येथे त्यांनी आयोजित केलेल्या ‘नि:शुल्क रोगनिदान व रुग्णभरती शिबिराच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
या शिबिरात ४०८ रुग्णांनी आपली तपासणी करून औषधोपचार करून घेतले. यावेळी शिबिरात नि:शुल्क औषध वितरणसुद्धा करण्यात आले. पुढील निःशुल्क उपचार व नि:शुल्क ऑपरेशनसाठी गरजू रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी सर्व शिबिरार्थींना मास्कचे वाटप करण्यात आहे. यावेळी .अनार राठोड, पुगोंदी उपसरपंच श
.हरीश राठोड, पं.स. सदस्या लताताई धारपुरे, धुरखेडा उपसरपंच सुदर्शन झोडे, योगेश चाफले, माजी जि.प. सदस्य डॉ.हरभजन धारपुरे, कोंढाळी माजी सरपंच वृषालीताई माकोडे, प्रमोद धारपुरे, दोडकी सरपंच .ज्ञानोबा तांदळे, .घनश्याम गांधी, .गुणवंता खवसे व इतर मान्यवर उपस्थित होते. शिबीर मालिकेचे मुख्य समन्वयक प्रा.डॉ. अनिरुद्ध देवके यांच्या मार्गदर्शनात शिबीर संपन्न झाले.   
 
     लोकनेते मा.श्री. रणजितबाबू देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या वतीने काटोल व नरखेड तालुक्यात २१ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर’२१ पर्यंत ‘नि:शुल्क रोगनिदान, रूग्ण भरती व रक्तदान शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले होते. या निःशुल्क शिबिरांत लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या जनरल मेडिसीन, शल्य-चिकित्सा, बालरोग, अस्थिरोग, प्रसुती/स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, छातीरोग, दंतरोग व चर्मरोगांसहित इतर सर्व रोगांच्या रुग्णांची विशेषज्ञद्वारा निःशुल्क तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. पुढील उपचारासाठी रुग्णांना लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथील जनरल वॉर्डमध्ये भरती केल्यानंतर त्या रुग्णांना १००% निःशुल्क उपचार व १००% निःशुल्क ऑपरेशनचा लाभ मिळत आहे. एमआरआय, सिटी स्कॅन तसेच इतर सर्व तपासण्यासुद्धा निःशुल्क करण्यात येत आहेत. फक्त औषधी व बाहेरील साहित्यांचाच खर्च रुग्णाला करावा लागत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल, सीताबर्डी, नागपूर येथे निःशुल्क हृदयविकार उपचार, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी व हार्ट ऑपरेशन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *