गतवर्षीच्या कर्जमाफीचे ५० हजार कधी देणार महाराष्ट्र सरकार…? कैलास रहांगडाले.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 4 मे. 2021
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शेतकऱ्यांना २ लाख रू.ची कर्जमाफी झाली . मात्र नेहमीच कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या नियमित शेतकरी वर्गातून व सोसायटी संस्थांमधून यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा सरकारने नियमित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीपोटी ५० हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान जाहिर केले व त्यावर पडदा टाकला. पण वर्ष होवून गेले तरी त्यावरही काही कार्यवाही तर झाली नाहीच पण हळूहळू तो विषयच विस्मरणात जातोय की काय अशी परिस्थिती झाली आहे. कारण ‘ह्युमन्स मेमरी व्हेरी शाॕर्ट’ म्हणतात त्याप्रमाणे अनेक शेतकरीही ती बाब आज विसरून जावू लागले आहेत व सरकार त्याचीच वाट पहात दिवस मोजत बसले आहे असेच वाटू लागले आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टींवर सरकारला जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा यांवर सरकार काही पुनर्विचार करेल असे वाटत नाही.