गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील वैनगंगा नदीवरील वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर
गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील
वैनगंगा नदीवरील वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर
गडचिरोली,(जिमाका)दि.23: गडचिरोली ते मुल सेक्शन NH-930 मार्गावरील वैनगंगा नदीवरील मोठया पुलाच्या Bearing ची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरीता एक महिण्याचा कालावधी लागणार असून दिनांक 20 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत light vehicles ची वाहतूक दररोज 4 तास बंद करणे व जड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गानी (गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड मार्गानी) वळविण्यास कळविले आहे.
त्याअनुषंगाने जड वाहनांची वाहतूक जसे ट्रक/बस इत्यादी दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यतच्या कालावधीकरीता पर्यायी मार्ग म्हणून गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड या मार्गाचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तसेच light vehicles जसे Car/Jeep/Ambulance इत्यांदी वाहतूक दिनांक 24 डिसेंबर 2021 ते 21 जानेवारी 2022 पर्यत सकाळी 6.00 वाजेपासून ते सकाळी 10.00 वाजेपर्यतच्या कालावधी करीता बंद ठेवण्यात येऊन उर्वरीत कालावधीकरीता सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
शेषराव येलेकर
विदर्भ चीफ न्यूज ब्युरो