गडचिरोली जिल्ह्यात 251 कोरोनामुक्त, 3 मृत्यूसह 43 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.27 मे 2021:
आज जिल्हयात 43 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 251 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 3 नवीन मृत्यूमध्ये कालीनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, हाल्दी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष व वायगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 43 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 04, आरमोरी 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 02 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 05 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 251 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 62, अहेरी 20, आरमोरी 13, भामरागड 04, चामोर्शी 64, धानोरा 13, एटापल्ली 06, मुलचेरा 28, सिरोंचा 16, कोरची 05, कुरखेडा 07 तसेच वडसा येथील 13 जणांचा समावेश आहे.