BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

गडचिरोली जिल्ह्यात 17 मृत्यूसह आज 574 नवीन कोरोना बाधित तर 400 कोरोनामुक्त

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम *गडचिरोली,दि.01*: आज जिल्हयात 574 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 400 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 17 नवीन मृत्यूमध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम
*गडचिरोली,दि.01*: आज जिल्हयात 574 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 400 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 17 नवीन मृत्यूमध्ये ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 32 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 20 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 64 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 28 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 42 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 574 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 184, अहेरी तालुक्यातील 47, आरमोरी 55, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 40, धानोरा तालुक्यातील 23, एटापल्ली तालुक्यातील 31, कोरची तालुक्यातील 23, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 30, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 30, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 27 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 76 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 400 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 176, अहेरी 38, आरमोरी 25, भामरागड 10, चामोर्शी 14, धानोरा 23 , एटापल्ली 20, मुलचेरा 12, सिरोंचा 9, कोरची 27, कुरखेडा 9, तसेच वडसा येथील 37 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *