गडचिरोली जिल्ह्यात आज 577 कोरोनामुक्त 16 मृत्यू , 519 नवीन कोरोनाबाधित
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी. दि.30 एप्रिल 2021 :- आज जिल्हयात 519 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 577 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 16 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी ,63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा , 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा , 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुरुष बेलगांव ता. कुरखेडा, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 519 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 53, धानोरा तालुक्यातील 22, एटापल्ली तालुक्यातील 46, कोरची तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 15, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 36 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 39 जणांचा समावेश आहे. तर आज *कोरोनामुक्त झालेल्या 577 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 174,* अहेरी 51, आरमोरी 69, भामरागड 13, चामोर्शी 35, धानोरा 33 , एटापल्ली 39, मुलचेरा 10, सिरोंचा 18, कोरची 18, कुरखेडा 46, तसेच वडसा येथील 71 जणांचा समावेश आहे.