गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने
Summary
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या राज्य व केंद्र सरकार मंजूर करत नसल्यामुळे आज सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधवांनी निदर्शने केली. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय उपाध्यक्ष […]
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींची निदर्शने
अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या राज्य व केंद्र सरकार मंजूर करत नसल्यामुळे आज सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधवांनी निदर्शने केली. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर यांच्या नेतृत्वात दुपारी १ ते २ च्या दरम्यान प्रचंड घोषणांच्या निनादात ओबीसी बांधवांनी निदर्शने केलीत.
प्रमुख मागण्या :- १) ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाचे प्रलंबित संविधानिक हक्क प्रदान करावे २)स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये . ३) ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. ४)ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी. तसेच मागील दोन वर्षापासून मॅट्रिकपूर्व स्कॉलरशिप देण्यात आलेली नाही ती त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. ५) राज्य सरकारने त्वरित वर्ग ३ व ४ पदाची पदभरती लवकरात लवकर घेण्यात यावी ६) केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे ७) एससी व एसटी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना सुद्धा शासकीय योजना त्वरित सुरू करण्यात याव्यात इत्यादी प्रमुख मागण्या लवकरात लवकर मंजूर करून ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा.
इत्यादी मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेमार्फत महामहीम राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार, पंचायतराज मंत्री कपिल पाटील , केंद्रीय ओबीसी पार्लिमेंटरी कमिटी अध्यक्ष राजेश वर्मा, राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष खा.भगवानलाल सहानी, विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, इतर मागासवर्ग बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांना पाठविण्यात आले .यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, उपाध्यक्ष पी एस घोटेकर,सचिव प्रा. देवानंद कामडी, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या विभागीय उपाध्यक्ष सौ भावना वानखेडे, महिला शहराध्यक्ष श्रीमती सोनाली पुन्यपवार , उपाध्यक्षा सौ पुष्पा करकाडे , सचिव सौ अर्चना किरमोरे, युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे, युवा उपाध्यक्ष राहुल भांडेकर, ज्येष्ठ सदस्य प्रभाकर वासेकर, दादाजी चापले, अरुण मुनघाटे, विनायक झरकर,पुरुषोत्तम झंझाड, नगरसेवक रमेश भुरसे, रमेश मडावी, नगरसेवक अनिल पोहनकर, सौ लता मुरकुटे, प्रा. विजय कुत्तरमारे, दत्तराज नरड, वासुदेव बट्टे, सौ. संध्या भेंडारे, चैताली चौधरी, वैभव जुवारे , सुरज डोईजड, शुभम वैरागडे , स्वप्निल घोसे, विठ्ठलराव कोठारे, सौ ज्योती भोयर , डॉ. दिलीप भोयर, सौ किरण चौधरी, सौ रेखा चीमुरकर,सौ विमल भोयर, आदी समाज बांधव उपस्थित होते.
प्रा शेषराव येलेकर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क