गडचिरोली जिल्यात भामरागड तालुक्यात पोलीस नक्षल चकमित एक जवान शहीद

गडचिरोली-
भामरागड तालुक्यात पोलीस नक्षल चकमक उडाली असुन यात एक पोलीस जवान शहीद
झाल्याची घटना घडली आहे.
भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात दिरंगी आणि फुलगार या गावा मध्ये गेल्या काही दिवसापासुन नक्षल वाद्यांनी तळ
उभारल्याच्या विश्रासर्ह माहितीच्या आधारे काल दि. १०/०२/२०२५ रोजी अपर पोलीस अधिक्षक प्रशासन आणि अपर पोलीस अधिक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८सी ६० चे पथक आणि सीआरपीएफ क्युएटी चे २ पथक रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकानी दि. १०/०२/२०२५ ला सकाळी पोलीसाकडुन घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात
नक्षलवादी आणि पोलीस पथकामध्ये गोळीबार सुरु होता
पोलीसांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्याचा तळ उद्धवस्त
केला असुन नक्षल साहित्य आणि विविध वस्तु जप्त केल्या
आहेत.
सदर कारवाई दरम्यान सी ६० पथकाच्या एका जवानाला
गोळीलागुन दुखापत झाली असुन सदर जवान तातडीने
सामान्य रुग्णालय गडचिरोली
हॉउसपीटील येथे हलवण्यात आले
होते. मात्र उपचारास दरम्यान त्या जवानाचा मुत्यु झाला सदर अमलदार महेश कवडु नागुलवार
रा. अनखोडा ता. चामोर्शी
जि . गडचिरोली असे त्याचे नाव असुन दि. १२/०२/२०२५ ला मुख्यलयात नेउन बाडीला तिरंगा लीपटुन सलामी व श्रद्धाजंली देण्यात आली. इतमात शहिद जवानाच्या मुळ गांव अनखोडा येथे नेऊन सलामी व श्रद्धाजंली देण्यात आली. उपस्थित एसपी साहेब गडचिरोली. आष्टी पोलीस अधिक्षक काळे साहेब. यानी भाव पुर्ण श्रद्धांजलि अर्पित केली. महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित व सर्व पोलीस प्रशासन उपस्थित व गावकरी शेतकरी उपस्थित राहुन महेश कवडु नागुलवार यांचे पन्शात आईं व पत्नी व दोन मुली असा त्याचा परिवार आहे. त्यांना विरमरण आल्याची माहिती मिळताच अनखोडा गाव शोकमान झाले व महेश नागुलवार यांना भावपूर्ण सलामी व श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज चामोर्शी तालुका
गजानन पुराम
मो. 7057785151