खैरगाव (चांदसुरला) येथील पहिला पोलीस बनल्याबद्दल तुषारचे स्वागत सा. कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे उप तालुकाप्रमुख बंडू पहानपटे व गावातील नागरिकांनी केले.

चंद्रपूर तालुक्यातील खैरगाव (चांदसूरला) या गावातील तुषार महादेव वाढई हा गावातून पहिला पोलीस बनल्यामुळे गावाचे नाव लौकिक झाले आहे. तुषारणे गरिबीची जाण ठेवत, अथक परिश्रमातून यश मिळवल्याबद्दल त्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे.कारण याआधी गावातील एकही पोलीस बनला नाही. त्याचे वडील ऑटो चालक व आई शेतमजुरीचे काम करून तुषारचे शिक्षण पूर्ण केले. तुषार ने आई-वडिलांची चाललेली तळमळ पाहून जिद्दीने मनाशी स्वप्न बाळगून कठोर परिश्रम करीत होता. आज त्याच्या मेहनतीला यश प्राप्त झाले आणि गावातील पहिला पोलीस बनल्याबद्दल तुषार चे व त्याचे परिवाराचे स्वागत सा.कार्यकर्ते व शिवसेना उप तालुकाप्रमुख शिंदे गटाचे बंडू पहानपटे, अविनाश भेंडारे शैलेश जाधव, लोकेश दुर्गे, शेखर भोयर, गुरुदास भोयर व गावातील नागरिक उपस्थित होते.
तुषारचे व त्याच्या परिवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्यावेळी सा. कार्यकर्ते व शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदे गट श्री.बंडू पहानपटे यांनी तुषार चा आदर्श घेऊन व प्रेरणा घेऊन गावातील युवकांनी ज्या क्षेत्रात युवकांना आवड व रुची असेल अशा क्षेत्रांमध्ये भरघोस यश प्राप्त करून गावाचे नाव लौकिक करावे,असे आव्हान केले.