खेळ कोंढाळी नगर पंचायत मध्ये सराव क्रीडांगण लवकरच साकारनार, प्रतिभावंत खेळाडूंची प्रतिभा उजळेल प्रशासक-धनंजय बोरिकर
Summary
कोंढाळी.वार्ताहर कोंढाळीनगर पंचायत येथील तरुणांमध्ये विविध कलागुण असून, त्या कला गुणांना उजाळा देण्यासाठी योग्य आणि आवश्यक सरावाची गरज असल्याने त्यांच्या खेळातील कलागुण दाखविण्यासाठी योग्य जागा व संसाधने उपलब्ध नाहीत, परिणामी ते विविध खेळांमध्ये कामगिरी करू शकत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी […]
कोंढाळी.वार्ताहर
कोंढाळीनगर पंचायत येथील तरुणांमध्ये विविध कलागुण असून, त्या कला गुणांना उजाळा देण्यासाठी योग्य आणि आवश्यक सरावाची गरज असल्याने त्यांच्या खेळातील कलागुण दाखविण्यासाठी योग्य
जागा व संसाधने उपलब्ध नाहीत, परिणामी ते विविध खेळांमध्ये कामगिरी करू शकत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने नगर पंचायत कोंढाळी येथे क्रीडा सराव मैदान बांधण्याचे नियोजन केले आहे. नगर पंचायत क्षेत्रात उपलब्ध असलेल्या जमिनीवर क्रीडा सराव मैदाने बांधण्याच्या योजनेंतर्गत नगर पंचायत क्षेत्रात उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींची पाहणी व सीमांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नगर पंचायत प्रशासक धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत नगर रचना बांधकाम अभियंता -रितेश श्रीनगरे यांच्या देखरेखी खाली नगर पंचायत कोंढाळी येथे पोहोचली, तेथे शासकीय जमिनींची पाहणी करण्यात आली. याशिवाय कोंढाळीच्या ले-आऊटमधील पी यू लॅंड च्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेची नगर पंचायत लवकरच पाहणी नंतर युवकांच्या क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी आवश्यक स्वरूपानुसार योग्य जागा ओळखून सराव क्रीडांगण तयार करेल अशी माहिती प्रशासक धनंजय बोरीकर यांनी दिली.
नगर पंचायत प्रशासक म्हणाले की, नगर पंचायतीत क्रीडा मैदानासाठी जमिनीचे सीमांकन करण्यात येत आहे. पुरेशी जागा उपलब्ध होताच क्रीडांगणाचे बांधकाम सुरू केले जाईल.
यावेळी नगरपंचायती चे नगररचना बांधकाम अभियंता रितेश श्रीनगरे , सौरभ उमरेडकर, पवन वैद्य, नंदकिशोर पैठे, विजय गेडाम आदी उपस्थित होते.