खेळामुळे चिकाटी व परिश्रम वृद्धिंगत होते……सुधीर महामुनी वार्षिकोत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
Summary
अर्जुनी/ मोर.: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी.इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिकोत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन थाटात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा होते.प्रमुख उपस्थिती संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैय्या, […]
अर्जुनी/ मोर.: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी.इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिकोत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन थाटात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा होते.प्रमुख उपस्थिती संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैय्या, संस्था सचिव सर्वेश भुतडा, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया सुधीर महामुनी, पोलीस निरीक्षक अर्जुनी मोर. कमलेश सोनटक्के, शाखा व्यवस्थापक एसबीआय अर्जुनी/मोर. अनुपम चक्रवती, शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण, उपप्राचार्या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालीवाल, जी.एम बी हायस्कूल च्या प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुते, वार्षिकोत्सव संयोजिका अर्चना गुरूनुले,श्रद्धा कापगते, क्रीडा शिक्षिका माधुरी वनवे यांची होती. सर्वप्रथम क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून रीतसर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख अतिथी सुधीर महामुनी यांनी सचिन तेंडुलकर,मेरी कोम,हुसेन बोल्ट यांच्यासारखे खेळाडूंचा आदर्श आपण घेतले पाहिजे त्यांच्यापासून घेतलेला आदर्श भविष्यात आपणास प्रेरणा देऊन यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. खेळामुळे चिकाटी व परिश्रम वृद्धिंगत होते असे मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी खेळामुळे शारीरिक विकास होतो म्हणून प्रत्येकाने खेळ खेळले पाहिजे असे मार्गदर्शन केले.शाखा व्यवस्थापक अनुपम चक्रवती यांनी खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे प्रत्येकांनी जीवनात खेळाला महत्व दिले पाहिजे असे मार्गदर्शन केले.प्राचार्य जे.डी.पठान यांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करून खेळ खेळावा असे अध्यक्षीय मार्गदर्शन बल्लभदास भूतडा यांनी केले. यानंतर विद्यार्थी खेळाडूंना खेळ भावनेची शपथ देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तर, विभागीय स्तर, तसेच राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या एकून सदतीस विद्यार्थी खेळाडूंना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच खेळावर आधारित योगा तसेच नृत्यावर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.कार्यक्रमाचे संचालन वर्ग अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी पूनम ताराम तर आभार सहाय्यक शिक्षक योगेश रोकडे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले.