खेल इंडिया 14 वयो गटात हँड बॉल स्पर्धेत-14वर्षेवयोगटात खेलो इंडिया नागपूर तर 17वर्षे वयोगटात लखोटिया भुतडा हायस्कूल अव्वल

खेल इंडिया 14 वयो गटात हँड बॉल स्पर्धेत-14वर्षेवयोगटात खेलो इंडिया नागपूर तर 17वर्षे वयोगटात लखोटिया भुतडा हायस्कूल अव्वल कोंढाळी – वार्ताहर लखोटिया भुतडा हायस्कूल , कनिष्ठ महाविद्यालय व अजिंक्य क्लब कोंढाळी यांच्या संयुक्त विद्यमाने, लखोटिया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानावर 14 आणि 17 वयोगटातील मुलांसाठी हँड बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात 14 वर्षे वयोगटात नागपूरच्या खेलो इंडिया क्लबने प्रथम, लखोटिया भुतडा हायस्कूल (स्टेट बोर्ड) द्वितीय तर लखोटिया भुतडा सीबीएसई हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १७ वयोगटातील सामन्यात लखोटिया भुतडा हायस्कूल व ज्युनियर (स्टेट बोर्ड) प्रथम, खेलो इंडिया क्लब नागपूर द्वितीय तर लखोटिया भुतडा हायस्कूल (स्टेट बोर्ड-ब) तृतीय क्रमांकावर राहिला. या क्रीडा स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक सनी बुहाडे-लखोटिया भुतडा हायस्कूल (स्टेट बोर्ड),तर सर्वोत्कृष्ट खेळाडू- खेलो इंडिया नागपूरच्या आदर्श खोडखाने, तसेच17 वर्षांखालील वयोगटात सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सच्चितानंद सिंग – खेलो इंडिया नागपूर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी जयदअली सय्यद लखोटिया भुतडा हायस्कूल (स्टेट बोर्ड) यांना प्रदान करण्यात आला. काटोल तालुका क्रीडा समन्वयक प्रा.परेशदेशमुयांनी 02 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजता 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील वयोगटातील मुलांच्या हँडबॉल सामन्याचे उद्घाटक परेश देशमुख होते, तर लखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक राहूल लध्दड, प्राचार्य सुधीर बुटे हे हँडबॉल (मुले) सामन्याचे प्रमुख पाहुणे होते. या सामन्यातील विजेते व सहभागी स्पर्धकांचा कोंढाळी पोलीस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, ज्येष्ठ नागरिक निम्मत पाटील ठवळे, गुलाफशा शेख, हनुमानसिंग राजपुरोहित, प्रणय सावरकर, कोमल धोटे, इरफान शेख, प्रसाद कडू, वसील शेख, राहुल बालपांडे,मोहसीन पठाण, आशु इरखेडे, गुड्डू पठाण, रोमन बेग, निखिल नौकरकर, निकेश ठवळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.या क्रीडा स्पर्धेत नागपूर, काटोल, कोंढाळी येथील 14 संघांनी सहभाग घेतला, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक हरीश राठी , उज्ज्वल मोटघरे, भूषण राचलवार आकिब खान यांनी दिली. या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समीर ठवळे, समीर लोणेरे, महेश माळवे, सय्यद आसिफी अली, सारंग नांबियार, जितेंद्र खोडणकर, प्रफुल्ल बाभूळकर, दर्शन माकोडे, उमर अली यांनी प्रयत्न केले.