खा. बाळू धानोरकरांना प्रदेश-उपाध्यक्ष्याकरिता राहुल गांधींची पसंती?
Summary
चंद्रपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, संघटनात्मक कामात श्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे नाराज थोरात यांनी दोन महिने […]
चंद्रपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. मात्र, संघटनात्मक कामात श्रेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे नाराज थोरात यांनी दोन महिने आधीच राजीनाम्याची तयारी दर्शविल्याचे कळते. दरम्यान, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील संभाव्य नेतृत्वाबदलाबाबत आज (5 जानेवारी ) राज्यातील काँग्रेस आमदारांची व्यक्तिशः मते जाणून घेणार असल्याचेही समजते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु असतानाच आपण राजीनामा दिलेला नसल्याचं खुद्द थोरात यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणमधील नेतृत्व बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्याकडे विधीमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षपद आहेत. तर तेलंगणचे उत्तमकुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्षाचे नेतेपद आणि मंत्रीपदही आहे.
त्यामुळे एक व्यक्ती एक पद या धोरणाची अलमबजावणी व्हावी, यासाठी पक्षातून आग्रह सुरू झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख व मंत्री नितीन राऊत, गुजरातचे प्रभारी राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा आहे.
मंत्रीपदासह आपल्यावर 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचंही थोरात यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसंच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचं थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचंही थोरातांनी म्हटलंय.
बाळासाहेब थोरात 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी थोरात यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांना दिल्लीत बोलावलं गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सध्या तरी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
यातील सुनील केदार यांच्या नावावर काँग्रेस चे निष्ठावान नसल्याची नाराजगी अनेक नेत्यांमध्ये आहे, दुसरे नाव असलेल्या यशोमती ठाकूर यांच्यावर पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे आहे शिवाय नाना पटोले हे विधानसभा स्पीकर असल्याने त्यांना सरकार समतोल सांभाळण्याची मोठी जबाबदारी असताना दुसरी महत्वाची जबाबदारी दिल्यास अनेक प्रोटोकॉल अडचणी येतील.
उर्वरित विजय वडेट्टीवार, राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव स्पर्धेत असले तरी सध्या महाराष्ट्रात काँग्रेस ला पुनर्जीवन देणारा शिवाय गांधी परिवारासोबत एकनिष्ठ अश्या नेत्याच्या शोधात दिल्ली काँग्रेस आहे. त्यामुळे ज्यापद्धतीने कोणतीही लॉबिंग नसूनही मुंबईत काम करणाऱ्या भाई जगताप यांना अचानक जबाबदारी देण्यात आली त्याच पद्धतीने कोणतीही लॉबिंग न करता महाराष्ट्रात काम करणाऱ्या एखाद्या नेत्याच्या गळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या अध्यक्षपदाची धुरा पडू शकते.
असे झाल्यास पुण्यातील भोर चे आमदार, आघाडी सरकार काळात महारष्ट्रात काँग्रेस राजकीय पीछेहाट झाली असताना त्यांनी काँग्रेस आमदारांमध्ये बांधून ठेवलेली एकमुठ व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असूनही महाविकास आघाडी सरकार मध्ये त्यांचे हुकलेले मंत्रिपद यामुळे राहुल गांधी यांचीं राष्ट्रीय पदावर पुनः वापसी होताच आमदार संग्राम थोपटें यांचीं प्रदेशअध्यक्ष तर महारष्ट्रातून एकमेव निवडून आलेले खासदार बाळू धानोरकर यांच्या नावाला प्रदेशउपाध्यक्षाकरिता पहिली पसंती असल्याचे दिल्ली येथील सूत्रांकडून कळते.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर