महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Summary

मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार […]

मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना करतो’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्याप्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *