खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या
Summary
आज गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या व निवेदन स्वीकारून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या अडचणी व […]

आज गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व खासदार श्री प्रफुल पटेलजी यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या व निवेदन स्वीकारून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. पक्ष संघटन बाबत चर्चा केली.
यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी. सडक अर्जुनी तालुक्यातील डॉ.अजय लांजेवार, डॉ.श्यामकांत नेवारे, श्री प्रदीप सहारे, सौ.रिताताई लांजेवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.