खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते शंकरपूर येथे अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन
Summary
चिमूर, जि. चंद्रपूर प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी वर्ष 2024-25 अंतर्गत मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे मंजूर झालेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ही अभ्यासिका उभारण्यामागील उद्देश […]
चिमूर, जि. चंद्रपूर
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी वर्ष 2024-25 अंतर्गत मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे मंजूर झालेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
ही अभ्यासिका उभारण्यामागील उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा असून, खासदार डॉ. किरसान यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम वातावरण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.
या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. सतीश वारजूरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष चिमूर डॉ. विजय गावंडे, सरपंच साईश वारजूरकर, उपसरपंच अशोक चौधरी, तालुका अध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, ग्रा.प. सदस्य नितीन सावरकर, गौरव येणप्रेड्डीवार, रोशन ढोक, सौ. सरिताताई चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181
