BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

खळबळजनक! भंडारा जिल्ह्यात पोलिसांचा ‘महा-सपाटा’; ७.२१ लाखांच्या मुद्देमालासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! ​पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा ‘अॅक्शन प्लॅन’; एकाच रात्री जिल्ह्याभरात धाडी टाकून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले!

Summary

भंडारा: संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले असतानाच, पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या एका आदेशाने गुन्हेगारी जगतात भूकंप आला आहे. “जिल्हा अमली पदार्थ आणि जुगारमुक्त करा,” या निर्धाराने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी धाडी टाकून ७,२१,९३६ रुपयांचा […]

भंडारा:
संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले असतानाच, पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या एका आदेशाने गुन्हेगारी जगतात भूकंप आला आहे. “जिल्हा अमली पदार्थ आणि जुगारमुक्त करा,” या निर्धाराने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी धाडी टाकून ७,२१,९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. खाकी वर्दीचा हा ‘रुद्र अवतार’ पाहून अवैध धंदेवाल्यांची पळता भुई थोडी झाली आहे.
​जिल्ह्यातील ‘ब्लॅक लिस्टेड’ आरोपींवर मोठी कारवाई:
​या मोहिमेत पोलिसांनी खालील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत:
​जवाहरनगर पो.स्टे.: जुगार खेळताना प्रदीप वातुजी बन्सोड (२८ वर्षे) आणि संदिप निलकंठ कान्हेकर (३८ वर्षे) यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले. तसेच जितेंद्र रणभीड मेश्राम (४१ वर्षे) याच्याकडून ५.६७ लाखांचा सडवा मोहापास जप्त केला असून, एका ४९ वर्षीय महिला आरोपीवरही गुन्हा दाखल केला आहे.
​भंडारा पो.स्टे.: संत लहरी वॉर्डातील भुषण मधुकर नंदनवार (४९ वर्षे) आणि शास्त्री वॉर्डातील ५२ वर्षीय महिला आरोपीला हातभट्टीच्या दारूसह अटक केली.
​कारधा पो.स्टे.: दवडीपार बाजार येथील हेमराज श्रीराम राउत (४६ वर्षे, जात-गोवारी) याला दारू तस्करी करताना पकडण्यात आले.
​मोहाडी पो.स्टे.: बेटाळा येथील दिलीप गोपीचंद ठोंबरे (४५ वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
​वरठी पो.स्टे.: शास्त्री वॉर्डातील दिपक काशीनाथ बर्वेकर (५४ वर्षे) याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त केला.
​करडी पो.स्टे.: दारूची विक्री करणाऱ्या शिसुपाल सदाशिव राऊत (४२ वर्षे, जात-कलार) याला मजुरीच्या आड अवैध धंदा करताना पकडले.
​तुमसर पो.स्टे.: येथे मोठी कारवाई करत मनोज सोमा हरदे (३९ वर्षे), नरेश थॉमस लुईस (४२ वर्षे) आणि ६५ वर्षीय व ५० वर्षीय दोन महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
​गोबरवाही पो.स्टे.: चिखला येथील किसन लक्ष्मीप्रसाद कठौते (३२ वर्षे) आणि पाथरी येथील पुरन गेंदलाल गहाणे (४० वर्षे) यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सडवा मोहफास जप्त केला.
​साकोली पो.स्टे.: गोंडउमरी येथील देवचंद शामराव रामटेके (५१ वर्षे, जात-महार) याला संत्री दारूसह अटक केली.
​लाखनी पो.स्टे.: सोमलवाडा येथील दिनेश शंकर हुमणे (४६ वर्षे) आणि एम.आय.डी.सी. भागातील ५४ वर्षीय महिला आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
​पालांदूर व अड्याळ: पालांदूर येथील योगराज राजौराम निरगुळे (४४ वर्षे), तर अड्याळमधील सुरेश नानाजी गजभिये (४८ वर्षे) आणि पहेला येथील ४५ वर्षीय महिला आरोपी (जात-महार) यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.
​पवनी पो.स्टे.: रामपुरी वॉर्डातील ६२ वर्षीय महिला आरोपी (जात-कोष्टी) हिला देशी दारू विकताना रंगेहात पकडले.
​नूरुल हसन यांचा कडक संदेश
​सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व ठाणेदार व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. दारू आणि जुगार अड्डयांवरून एकूण ७,२१,९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

वृत्त संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *