खंडाळा शिवार कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यु
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर बॉयपास रोडवर कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१९) डिसेंबर ला पोलीस हवालदार जयलाल सहारे हे पोस्टे कन्हान ला द्वितीय ड्युटी अधिकारी म्हणुन कर्तव्या वर हजर असतांना पोस्टे च्या फोन वर सायंकाळी ७.१४ वाजता दरम्यान माहिती मिळाली कि खंडाळा शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर बॉयपास रोडवर कन्हा न नदी पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा अपघात झाला असुन मृत अवस्थेत पडुन आहे. अश्या माहितीने पो हवा. जयलाल सहारे हे आप ल्या सहका-या सह घटनास्थळी पोहचले असता तेथे एक इसम मृत अवस्थेत रोडवर पडलेला असुन मृतका च्या प्रेताची पाहणी केली असता त्याचा डोक्यातुन, पायातुन रक्त निघत असुन त्याचा डोक्यावरून व पाया वरून वाहन गेल्याचे दिसुन आले. सदर मृतकाची तपासणी केली असता त्याचे जवळुन कोणतेही ओळ खपत्र व कागजपत्र प्राप्त न झाल्याने घटनास्थळावर परिसरातील लोकांना विचारपुस केली. त्यांच्या कडुन माहिती पडले कि, सदर इसम हा नेरी शिवारातील ईट भट्टीवर काम करणारा असावा यावरून त्या ठिकाणी जाऊन मृतक इसमाची फोटो दाखवुन माहिती विचार ली तर तेथील सुपरवाइजर शंकर शिवपुजन राॅय याने इसमाचे फोटो पाहुण सांगितले कि सदर इसमाचे नाव पप्पु मातादिन सरोज वय ४५ वर्ष राह. सरई नरहर पीयरीया प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु नेरी भट्टा कामठी येथे काम करण्याकरिता आला असुन त्याचा सोबतचा मजदुर दिसत नसल्यामुळे त्याला पाहण्यास राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर बॉयपास रोड कडे गेला होता असे सांगितले. सदर इसमास अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळ जीपणे चालवुन इसमाला धडक देऊन त्याच्या मुत्युस कारणीभुत असल्याने अज्ञात वाहन चालक वाहना सह पळुन गेल्याने कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी पो हवा जयलाल सहारे यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध कलम २७९, ३०४ अ , १८४, १३४ (अ), १३४ (ब) भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलिस योद्धा न्यूज चॅनल