खंडाळा शिवारातील तीन फाऊंडरी वर्क्स फार्म मध्ये ६१,६५० रुपयाचे साहित्य चोरी
खंडाळा शिवारातील तीन फाऊंडरी वर्क्स फार्म मध्ये ६१,६५० रुपयाचे साहित्य चोरी
कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच कि मी अंतरावर असलेल्या खंडाळा शिवारातील तीन फाऊं डरी मधुन कोणीतरी अज्ञात चोराने लोखंडी व इतर सामुग्री सह एकुण ६१,६५० रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.१०) ऑक्टोबर २०२१ चे रात्री १२ वाजता ते शुक्रवार (दि.४) मार्च २०२२ चे ७ वाजता दरम्यान वैशाली कसतुर गजभिये वय ४९ वर्ष राह. नागार्जुन काॅलोनी, जरीपटका नागपु र यांचे खंडाळा शिवारात १ एकर शेती असुन भाऊ व आई आणि तिचे तिन फाऊंडरी वर्क्स फार्म असुन वैशाली गजभिये व तिचे नातेवाईक हे लाॅकडाऊन च्या नंतर आपले शेतातील फार्मवर गेले असता वैशाली कसतुर गजभिये हिने आपल्या फाऊंडरी वर्क्स मध्ये लावण्यात आलेले वैशाली फाऊंडरी वर्क्स चे A) १) ६ चिमणी मध्ये लागणारे ब्लोअर (भोन) किंमत १२,००० रुपये, २) ७ लोखंडी घन हातोडे १४०० रूपये, ३) १५ घमेले ७५० रूपये, ४) २० पावडे १४०० रूपये, ५) १५ टिकास लोखंडी १५०० रूपये, ६) २ सब्ब्ल ३०० रूप ये, ७) १ टॅक्ट्रर चा पटलर १०,००० रूपये असा एकुण २७,३५० रूपयाचा मुद्देमाल. (B) विजय फाऊंडरी वर्क्स मधिल १) ६ चिमणी मध्ये लागणारे ब्लोअर (भो न) किंमत १५,००० रूपये, २) ७ लोखंडी घन हातोडे १४०० रूपये, ३) १० लोखंडी घमेले १००० रूपये, ४) २ लोखंडी सब्बल ३५० रूपये, ५) २० लोखंडी पावडे किंमत १००० रुपये, ६) १५ टिकास लोखंडी १००० रुपये असा एकुण १९,७५० रुपयाचा मुद्देमाल. (C) कलावती फाऊंडरी वर्क्स चे १) ६ चिमणी मध्ये लाग णारे ब्लोअर (भोन) किंमत १०,००० रूपये, २) ७ लोखंडी घन हातोडे १२०० रुपये, ३) १० लोखंडी घमे ले १००० रुपये, ४) २ लोखंडी सब्बल ३५० रुपये, (५) २० लोखंडी पावडे १००० रुपये, ६) १५ टिकास लोखं डी १००० रुपये असा एकुण १४,५५० रुपयाचा मुद्दे माल असा एकुण तिन्ही फाऊंडरी वर्क्स फार्म मधिल ६१,६५० रुपयाचे साहित्य मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वैशाली कसतुर गजभिये यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१, ३८० भांद वि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे
संजय निंबाळकर