क्षेत्र रक्षकाची मद्यप्राशन करून महिला वनरक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ पीडित महिला वनरक्षकाने वनविभाग व पोलीस ठाण्यात दिली लेखी तक्रार

▪ क्षेत्र रक्षकाची मद्यप्राशन करून महिला वनरक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ पीडित महिला वनरक्षकाने वनविभाग व पोलीस ठाण्यात दिली लेखी तक्रार
▪ 48 तास लोटूनही कारवाई चा पत्ताच नाही▪
पोलीस योद्धा वृत्तसंस्था
जिल्हा प्रतिनिधी
आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पिलापुर मौजा चे क्षेत्र सहाय्यक एस. बी. बारसे यांनी मद्यप्राशन करून सुजातपुर मौजा च्या महिला वनरक्षक स्वाती वानखेडे यांना मोजमाप पुस्तिकेच्या कारणावरून अत्यंत अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सदरचा प्रकार मोबाईल मध्ये कैद करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविला. या प्रकाराने महिला वनरक्षक चांगल्याच हादरल्या. याप्रकरणी वनविभाग व पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देण्यात आली. मात्र दीड दिवस लोटूनही वनविभागाने काहीही कारवाई केली नाही . त्यामुळे वनविभाग मद्यप्राशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वनरक्षक महिलेने केला आहे.
बुधवार दिनांक 18 वर्धा वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक बि. एन .स्वामी यांचा दौरा होता. त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात होते .या कार्यालयाच्या परिसरात पिलापूर वनक्षेत्राचे कार्यालय आहे . दरम्यान सुजातपुर मौजा च्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहाय्यक कार्यालयात गेल्या .त्यांनी क्षेत्र सहाय्यक एस. बी. बारसे यांना मोजमाप पुस्तिका मागितली . मात्र बारशे दुपारी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करून होते. तसेच अर्धनग्न अवस्थेत वस्त्र परिधान केले होते .
त्यांनी महिला वनरक्षकाची म्हणणे ऐकून न घेता विनाकारण अश्लील भाषेत कमरेच्या खाली शिवीगाळ सुरू केली . बोलण्याची पातळी अत्यंत खालावलेली . हा सर्व प्रकार महिला वनरक्षक यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. या प्रकरणी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर यांना सर्व हकीकत सांगितली व लेखी फिर्याद सुद्धा दिली . यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक स्वामी यांनाही मोबाईल मधील सर्व प्रकार दाखविला . वस्तुस्थिती नुसार कारवाई करण्याची विनंती केली. त्यांनी उपवनसंरक्षक वर्धा यांना कारवाईचा प्रस्ताव पाठवा असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला आदेशित केले. मात्र अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधी लोटल्यानंतरही या मद्यधुंद क्षेत्र सहाय्यकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही .
आज सकाळी वनरक्षक स्वाती वानखेडे यांनी आरती पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन लेखी फिर्याद दिली असताना आष्टी पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांनी नेहमीप्रमाणेच या महिला वनरक्षकांना न्याय देण्याऐवजी मद्यधुंद क्षेत्र सहाय्यकाची पाठराखण करून गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शविली .
याबाबत मात्र ठाणेदार लोकरे यांनी दरेकर यांची चौकशी करून महिला वनरक्षकाची न्याय देण्याची मागणी आष्टी तालुक्यात होऊ लागली .
क्षेत्र सहाय्यक एस .बी . बारसे यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यामुळे वनविभाग आणि ठाणेदार या दोघांकडूनही कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याने महिला वनरक्षक चांगल्याच हतबल होऊन दहशतीत आल्या आहे . जर आठ दिवसांमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही . तर सदर प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट करून वन विभागासह पोलिसांनाही आरोपी करून उपोषणा द्वारे न्याय मागणार असल्याचे स्वाती वानखेडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
▪ आष्टी पोलीसातील निरीक्षक दरेकर की लोकरे ?▪
यापूर्वी आठ एप्रिल नंतर 18 मेला दरेकर यांनी पुन्हा पोलिस कारवाईत असमर्थता दर्शवली वनपरिक्षेत्राधिकारी गायने व पोलीस निरीक्षक लोकरे बघ्याच्या भूमिकेत. गांधी जिल्ह्यात महिलांना न्याय कधी मिळणार??
▪ सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून महिला वनरक्षकाकडून मला तक्रार प्राप्त झाली . या प्रकरणी चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव उपवनसंरक्षक वर्धा यांना सादर करणार सदर अधिकाऱ्यावर कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील .
आर. बी .गायनेर.
प्रभारी वनपरिक्षेत्र
अधिकारी, आष्टी (श)
▪ पिला पुरचे शेत्र सहाय्यक बारसे यांनी महिला वनरक्षक स्वाती वानखेडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार वन महिला वनरक्षक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दाखल केली. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीने उपवनसंरक्षक वर्धा यांना चौकशी करून कारवाई संदर्भात पत्र पाठविण्याचे आदेश दिले .
० बि. एन स्वामी .०
सहाय्यक उपवनसंरक्षक,
वर्धा वन विभाग
महेश देवशोध ( राठोड )
जिल्हा ,प्रतिनिधी वर्धा