BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

क्रीडा व सांस्कृतिक कलेचे जतन करा- सभापती संजय डांगोरे

Summary

कोंढाळी-प्रतिनीधी/ दुर्गाप्रसाद पांडे काटोल पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन सोमवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचधार येथे आयोजन करण्यात आले यामध्ये कार्यक्रमाध्यक्ष म्हणून संजय डांगोरे पंचायत समिती सभापती काटोल यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित […]

कोंढाळी-प्रतिनीधी/ दुर्गाप्रसाद पांडे
काटोल पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन सोमवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचधार येथे आयोजन करण्यात आले यामध्ये कार्यक्रमाध्यक्ष म्हणून संजय डांगोरे पंचायत समिती सभापती काटोल यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित करतेवेळी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये खेळ भावना निर्माण व्हावी तसेच त्यांचे शरीर बुद्धिबलवान व्हावी यासाठी क्रीडा व संस्कृतीचे जतन करावे असे मत प्रगट केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक लेझीम च्या तालात व स्वागतगीत सादर करून विद्यार्थ्यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय डांगोरे, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई चापले, उपसभापती निशिकांत नागमोते, माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य अनुराधाताई खराडे, चंदाताई देव्हारे, अरुण ऊईके, लताताई धारपुरे, प्रतिभाताई ठाकरे, तसेच गटविकास अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी झेलगोंदे, कृषी अधिकारी गोरठे गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, विस्तार अधिकारी नरेश भोयर, सरपंच उर्मिला ताई महल्ले, उपसरपंच वनराज उईके, प्रमोद चाफले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप महल्ले यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक भाषणात गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांनी गेल्या अडीच वर्षांपासून तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन रखडले होते तरी पंचधार येथील स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे एक नवीन ऊर्जा तयार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे शिक्षण विभागाचे लक्ष असेल विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही प्रसंगी देण्यात आली व प्रमुख पाहुण्यांचे त्यांनी धन्यवाद मानले कार्यक्रम प्रसंगी पुष्पाताई चापले जिल्हा परिषद सदस्य , उपसभापती निशिकांत नागमोते पंचायत समिती माजी सभापती, धम्मपाल खोब्रागडे, अनुराधाताई खराडे पंचायत समिती सदस्य, अरुण ऊईके, गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी प्रसंगी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी नरेश भोयर यांनी केले कार्यक्रमाला पंचधारचे ग्रामपंचायत सदस्य सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक उपस्थित होते तसेच एकूण २० शाळा 250 विद्यार्थी स्पर्धक तसेच 70 शिक्षक या सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. सर्व शिक्षक वृंद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे खोखो कबड्डी स्पर्धेचे प्रसंगी आयोजन झाले होते व रिधोरा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *