चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

क्रांतीराव महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, उर्जानगर तर्फे क्रांतीराव महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Summary

प्रतिनिधी चंद्रपूर           ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान खुले रंगमंच पटांगण व स्नेहबंध सभागृह ऊर्जा नगर वसाहत महा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ११ एप्रिल ला क्रांती राव महात्मा […]

प्रतिनिधी चंद्रपूर
          ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान खुले रंगमंच पटांगण व स्नेहबंध सभागृह ऊर्जा नगर वसाहत महा औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ११ एप्रिल ला क्रांती राव महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्ताने व्याख्याते माननीय प्रफुल्लक क्षीरसागर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते सरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्ष आणि आजच्या समाज या विषयावर अभ्यासपूर्ण आणि सामाजिक चळवळीच्या अनुभवातून सविस्तर मार्गदर्शन आणि प्रबोधन केले.
         आज रविवार दिनांक १४ एप्रिल भीम जयंतीला सकाळी नऊ वाजता खुले रंगमंच पटांगण ऊर्जानगर वसाहत येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते समारोहाचे उद्घाटन व धम्म ध्वजारोहण पंचशील त्रिशरणाने भीम जयंती च्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माननीय एडवोकेट वैशाली डोळस ताई औरंगाबाद (महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी विचाराचे सुप्रसिद्ध व्याख्यात्या) यांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी या विषयावर प्रबोधन पर विचारात आजची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व मूलभूत मानवी मूल्यांचे होत असलेले व्यापारीकरण आणि वर्तमानातील धोके यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माननीय श्याम राठोड साहेब उपमुख्य अभियंता यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – माननीय गिरीश कुमरवार साहेब, समिती अध्यक्ष तथा मुख्य अभियंता साहेब यांनी ऊर्जानगरवासीयांना शुभेच्छा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक आदर्श आणि त्यांच्या मानवतावादी कार्यावर आपले विचार मांडले. प्रमुख अतिथी अनिल फुनसे साहेब, उपमुख्य अभियंता मा. हनींद्र नाखले साहेब, उपमुख्य अभियंता मा. दिलीप वंजारी साहेब, कल्याण अधिकारी सौ. गिरीश कुमरवार ताई, सौ शाम राठोड ताई आणि इतर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी माननीय निलेश भोंगाडे, मा. एकता मेश्राम मा. मंदार वंजारी, मा. भीमराव उंदीरवाडे, मा. राजेश आत्राम हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु रंजना वानखडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन माननीय भीमराव उंदीरवाडे यांनी केले.
            ११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०८:०० वाजता माननीय उमेश बागडे आणि संच प्रस्तुत बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा प्रयोग झाला.
दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०६:०० ते रात्री ०९:०० दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन हे अभ्यासातून देणे योग्य ठरेल म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता यावी त्यांना ते किती तास अभ्यास करू शकतात याची मर्यादा कळावी, ही भावी पिढी मोबाईल च्या तांत्रिक जाळ्यात अडकून न राहता वाचन व लेखन संस्कृतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला वारसा जपण्यासाठी याही वर्षी जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थी महिला पुरुष अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १५ तास निरंतर अभ्यास उपक्रम व मानवंदना देण्यासाठीच्या कार्यक्रमात फार उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वांनी या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन केल्याच्या उत्साह भाग देणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यांच्यासाठी उत्सव समिती पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपली महत्त्वाची भूमिका पार पाडली.
त्याचबरोबर कार्यक्रमाच्या विविध उपसमित्यांचे व्यवस्थापन पदाधिकारी यांनी उत्तम आयोजन केले. दिनांक १३ एप्रिल २०२४ ला विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. व स्थानिक कालावंतांच्या सदाबहार गीत गायनाचा कार्यक्रम झाला.
१४ एप्रिल २०२४ खुले रंगमंच पटांगण ऊर्जानगर वसाहत येथून सायंकाळी ०७:०० वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यात क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांच्या पहिल्या मुलीच्या शाळेची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चवदार तळ्याची झाकी (प्रदर्शनी) हे मिरवणुकीत प्रमुख आकर्षण होते. क्रांतीराव महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ऊर्जानगरचे कार्याध्यक्ष आयु निलेश भोंगाडे यांच्या नेतृत्वात सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले मिरवणूक समाप्तीनंतर समितीच्या वतीने सर्वांनी केलेल्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *