अकोला महाराष्ट्र हेडलाइन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ज्ञानज्योती शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Summary

अकोला | प्रतिनिधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून स्थानिक गायत्री नगर येथील इंग्लिश हायस्कूल तसेच ज्ञानज्योती प्रायमरी व प्री–प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हे स्नेहसंमेलन जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे मोठ्या थाटात […]

अकोला | प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून स्थानिक गायत्री नगर येथील इंग्लिश हायस्कूल तसेच ज्ञानज्योती प्रायमरी व प्री–प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हे स्नेहसंमेलन जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे मोठ्या थाटात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष दादासाहेब बोबडे होते, तर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा. न्यायमूर्ती संजयजी मेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मागील शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा स्काऊट अधिकारी किरण लहाने व संस्थेचे कोषाध्यक्ष अजयजी बोबडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार तडस यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीपसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच ज्ञानज्योती प्रायमरी व प्री–प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका उत्कंठा बोबडे यांनी पालकांना संबोधित करत गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. यशस्वी पुरी हिने साकारलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रभावी भूमिकेने झाली. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्यप्रयोग व विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
ज्ञानज्योती इंग्लिश प्रायमरी व प्री–प्रायमरी स्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन सूर्यकांता राठोड यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन नरेश पाटील, पाहुण्यांचा परिचय व आभारप्रदर्शन स्नेहसंमेलन प्रमुख बहादुरसिंह चौहान यांनी केले. उद्घाटन समारंभाचे संचालन राजेश्वरी पांडे, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन दीपिका आडे यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
शिक्षक व पालकांची मोठी उपस्थिती
या स्नेहसंमेलनास शिक्षकवृंद सचिन खर्चे, संतोष पुरी, प्रणिता पवार, प्रियंका कानोडे, किरण खोडस्कर, प्रियंका तिहिले, शुभांगी कावरे, पुनम जाधव, प्रज्ञा अंबाडकर, वैशाली काटेकर, राजश्री टाकळकर, ज्योती बोबडे, दीक्षा नावकार, अनंता नागे यांच्यासह बहुसंख्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामाजिक मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *