क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
आरमोरी येथे तथागत गौतम बुद्ध विहारात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प़बोधनी महिला मंडळाच्या अध्यक्क्षा शालिनी ताई गेडाम होत्या. प़मूख वक्ता म्हणून महिला लोक आयोगाच्या मंजूषा दोनाडकर व भाजप महिला आघाडी च्या संगिता रेवतकर होत्या. प़मूख पाहूण्या म्हणून नगसेविका सूनिता मने,सूनिता चांदेवार, तागवानताई हया होत्या. प्रमुख वक्त्या मंजुषा दोनाडकर म्हणाल्या, फुले दाम्पत्यांचा ज्यावेळी जन्म झाला त्या काळात बहुजन समाज अंधश्रद्धा, दैववाद, दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव इत्यादी जोखंडात जखडलेला होता, या जोखडातून बहुजन समाजाला बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ज्योतीबांनी ओळखले होते. त्यातही मुलगी जर शिक्षित असेल तर ती दोन घराचा उद्धार करेल, एक म्हणजे तिच्या माहेरचा आणि दुसरा म्हणजे सासरचा. म्हणून स्त्रियांना सर्वप्रथम शिक्षित करण्याचे ध्येय ज्योतीबांनी मनाशी बाळगले होते आणि म्हणून त्यांनी सावित्रीला पहिले शिक्षित केले. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या आणि त्या दिवसापासून स्त्रियांना गुलाम ठेवू पाहणाऱ्या स्त्रियांचे शोषण करणाऱ्या त्यांच्यावर एकाधिकार गाजविणाऱ्या शोषक वर्गाची मक्तेदारी संपुष्टात येऊ लागली. हे शिक्षणाचे कार्य करत असताना त्यांना समाजकंटकांचे सेण गोळे, माती धोंडे, अंगावर घ्यावे लागले, हालअपेष्टा सोसाव्या लागल्या म्हणून स्त्रियांना आज त्यांना त्यांचे उज्वल भविष्य पाहता येऊ लागले. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहे. हे सर्व क्रांतिज्योती सावित्री बाई मुळेच शक्य झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शालिनीताई गेडाम यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला उपस्थित बहुतांश महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई विषयी आपले मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे संचालन छायाताई गजभिये तर प़ास्ताविक प़बोधनी महिला मंडळाच्या सचिव अंजली रोडगे आणि आभार प़रर्शन विदया चौधरी हयांनी केले. सदर कार्यक्रमात व़ूंदा चहांदे, शालिनी सूखदेवे, मंदाकिनी चौधरी, ज्योती उंदिरवाडे, संध्या रामटेके, भूमिका कमलेश बागडे, लक्षमी खेडकर, शोभा राठोड यांच्यासह बहूसंख्य महिला उपस्थित होत्या.
प्रा शेषराव येलेकर
विदर्भ न्यूज चीफ ब्यूरो