क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत. शिक्षण संचालक यांचे पत्र.
Summary
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत. शिक्षण संचालक यांचे पत्र. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 23 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022 23 आवेदन […]
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२२-२३आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत. शिक्षण संचालक यांचे पत्र.
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 23 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022 23 आवेदन ऑनलाइन मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो, अशा समर्पित वृत्तीने कामकरणान्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणान्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर
https://forms.gle/z5mw9A2Tu6J3zyNA
या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ मे २०२३ रोजी पासून दिनांक १५ जून २०२३ रोजी पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे संभाव्य वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.
सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना / लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचल असे पाहावे.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
संपूर्ण निवड प्रक्रिया निकष शासन निर्णय