क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांसाठी दोन विशेष पुरस्कारांसह १११ शिक्षकांची निवड सोमवारी पुरस्कार प्रदान कार्यक्रम
Summary
मुंबई, दि. 21 – सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशींनुसार शासनाने एकूण 109 शिक्षकांची निवड केली आहे. याचबरोबर दोन विशेष पुरस्कारांच्या समावेशासह एकूण 111 शिक्षकांना सन्मानित करण्यात […]
मुंबई, दि. 21 – सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशींनुसार शासनाने एकूण 109 शिक्षकांची निवड केली आहे. याचबरोबर दोन विशेष पुरस्कारांच्या समावेशासह एकूण 111 शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत प्राथमिक, माध्यमिक तसेच आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक यांचा समावेश आहे.
यामध्ये : प्राथमिक शिक्षक – ३८, माध्यमिक शिक्षक – ३९, आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे प्राथमिक शिक्षक – १९, आदर्श शिक्षिका पुरस्कार (क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार) – ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा – २, दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक – १, स्काऊट/ गाईड शिक्षक – २ अशा प्रकारे एकूण १०९ आणि २ विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या पुरस्कारांचा वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
शिक्षक पुरस्कार_2_18 सप्टेंबर 2025
शिक्षक पुरस्कार_1_18 सप्टेंबर 2025
00000
