कौटुंबिक स्वास्थ सांभाळण्याकरिता प्रमुखांनी संयम पाळावे : डॉ जगदिश राठोड

पुणे : नुकतेच सणसवाडी येथे कौटुंबिक स्वस्त चांगले रहावे या करिता कुटुंब प्रमुखांनी कुटुंबात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी बाबत संयम पाळून निर्णय घेण्यात यावे ,असे संमोहन तज्ज्ञ डॉ जगदिश राठोड म्हणाले.
सविस्तर वृत्त असे की कुटुंबिक स्वस्थ शिबिर हे भाग्योदय महिला फाउंडेशन तर्फे घेण्यात आले होते . या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापिका रोमांकिनि पवार मॅडम ह्या होत्या व प्रमुख मार्गदर्शक वक्ते हे संमोहनतज्ञ डॉ जगदीश राठोड हे मंचावर स्थानापन्न झाले होते त्या कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबात छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होतात व विकोपाला पोहोचतात तरी ते दूर करण्यासाठी घरातील महिलांची मुख्य भूमिका असते अशा प्रसंगी यांचे ताण तणाव व्यवस्थित असणे गरजेचे आहे तसेच तर आर्थिक व्यवस्था, बचत कसे करावे , पालकनि पालकत्व कसे पाळावे. त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्ती व्यसनापासून दूर कसा राहिला पाहिजे याबाबत माहिती संमोहन तज्ञ डॉ जगदीश राठोड सर यांनी येथील उपस्थित असलेल्या भाग्योदय महिला फाउंडेशनच्या महिला व सणसवाडी येथील महिला यांना अगदी सविस्तरपणे प्रात्यक्षिकाच्याद्वारे समजून सांगितले या कार्यक्रमाचे संचलन अंकिता मॅडम यांनी केले तर आभार पुनम मॅडम यांनी मांडले.
या कार्यक्रमात सणसवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.