*कोविड १९प्रतिबंधात्म लसीकरनाची केंद्र वाढविण्याचे निर्देश* *जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष व जिल्हाधिकारी नागपुर यांचे निर्देश*
वार्ताहर-कोंढाळी
नागपुर जिल्ह्यात (नागपुर शहर व ग्रामीण) कोरोना विषाणू (कोविड १९)चा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. सदर विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्या साठी प्रभावी उपाययोजना करणे सुरू आहे.या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग प्रतिबंधात्म कायदा १८९७अन्वये कोरोणा प्रादुर्भाव रोखण्या करिता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्म उपाययोजना करण्यात येत आहेत,.आता काटोल तालुक्यातही कोरोणा प्रतिबंधात्म लसीकरनाची मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरीही कोरोणा रूग्णसंखेत वाढ सुरूच आहे. कोरोणा लसीकरणा करिता ६०वर्षावरील तसेच ४५ते५९वयो गटातील कोम्बाइड व्यक्ती यास पात्र आहेत.
त्या अनुषंगाने गावातील संबधितांना लसीकरण केंद्रावर जाण्या साठी गावांचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम अधिकारी (तलाठी), ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक,कृषी सहायक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,यांनी प्रत्येकी २०व्यक्तींना लसीकरण केंद्रावर जाण्या साठी प्रवृत्त करावे. सदर लसीकरन २६मार्च व२७मार्च २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी-कोंढाळी, दुधाळा, खुर्सापार, तरोडा,अॅलोपेथिक दवाखाना-मसोद- मासोद, कामठी, धोतीवाडा, पुसागोंदी, जाटलापुर धुरखेडा,आयुर्वेदीक दवाखाना मुर्ती- मुर्ती,चंदनपार्डी, भोरगढ, पांढर ढाकणी, चिकलागढ,उपआरोग्य केंद्र पांजरा काटे- पांजरा, मसाळा, मिनिवाडा, दोडकी, वसंत नगर ,घुबडी, प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा- कचारी सावंगा, वाई कोंढासावळी पंचधार,मेंढेपठार, नांदोरा चिखली (माळोदे),अॅलोपेथिक दवाखाना-रिधोरा- रिधोरा, घरतवाडा, वंडली वाघ, खापरी, सावळी बु ,ढवळापुर उपकेंद्र-ढवळापुर, लिंगा, पारडी गोतमारे, कोहळा, हातला, कुकडी पांजरा, उप केंद्र डोरली भिंगारे- डोरली, राऊळगाव धनकुड, सोनखांब कोतवाल बर्डी, चारगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र-येनवा-येनवा , येरला धोटे, पानवाडी, कलंभा, मोहखेडी खामली,राजनी, उपकेंद्र-पारडसिंगा-पारडसिंगा,खानगाव ,कोलंबी, दिग्रस,वडविहीरा,
या आरोग्य केंद्र, अॅलोपेथिक, व आयुर्वेदिक केंद्र व उपकेंद्रात लसीकरनाची केंद्र सुरू असतील अशी माहिती काटोल तालुका आपत्ती व्यवस्थापन इंडिकेटड अधिकारी व तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार निलेश कदम, राजेंद्र जंवजाळ, एन टी टिपरे यांनी दिली आहे ..