कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट
Summary
मुंबई, दि. २८- राज्यातील अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई महानगरपालिकेमार्फत खाजगी रुग्णालयांच्या सहकार्याने विविध ठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी […]
मुंबई, दि. २८- राज्यातील अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई महानगरपालिकेमार्फत खाजगी रुग्णालयांच्या सहकार्याने विविध ठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे तसेच गोरेगाव पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित लसीकरण शिबिरास मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.
मुंबई महानगरपालिका आणि रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरांमध्ये अंधेरी येथे मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू, प्रशिक्षक, पंच, कर्मचारी आदींचे लसीकरण करण्यात येत आहे. या भेटीप्रसंगी असोसिएशनच्या नवीन लोगोचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. खासदार प्रियंका चतुर्वेदी, नगरसेवक राजू पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. तर गोरेगाव येथील शिबिरास आमदार सुनील प्रभू यांची उपस्थिती होती.