कोरोना ❓ खरं की खोटं? षडयंत्र? राजकारण? लुटमार? मग बाकी आजार गेले कुठे❓
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम 26 एप्रिल 2021
कोरोना रोग खरंच आहे का? असेल तर भारतातच त्याचा जास्त शिरकाव कसा आणि केव्हा झाला? भारतात हा रोग आला मात्र भारतात उष्ण कटिबंधीय वातावरणामुळे मार्च 2020 लाच कोरोना ची साखळी तुटून कोव्हिडं 19 भारतातून नष्ट झाला आहे. असे भाजपतर्फे घोषित करण्यात आले होते.मग असे असेल तर आज 2021 चा मार्च संपला तरी लोक कसे आणि का मरत आहेत ? : लोक कोरोना मुळे नाही तर त्यावर केल्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या उपचारामुळे मरत आहेत.? घरात टाचा घासून कोरोना मुळे कोणी मेल्याची बातमी कोणाच्या कानावर असेल तर सांगा. महाराष्ट्र तथा भारतात कोरोना महामारी आहे का? महामारी असती तर किड्या मुंग्या सारखी लोक घराघरात मेली असती. भारतात व महाराष्ट्रात कोरोना रोग बिलकुल सुद्धा नाही. कोरोना पोजिटिव्ह असणारे आणि ताप,थंडी,दमा, निमोनिया असणारे लाखो रुग्ण कसे सापडत आहेत? टेस्ट मुळे ? .जेव्हा जेव्हा सरकार टेस्ट वाढवते तेव्हा तेव्हा ही संख्या वाढते.माहिती आधिकाराखाली माहिती मागवली तेव्हा समजते की निवडणूक किंवा तत्सम काळात टेस्ट बंद केल्या तसा रुग्ण आकडा शून्य होऊ लागला. ? एप्रिल 2021 पासून पुन्हा महाराष्ट्र व देशात टेस्ट सुरू केल्या तसा आकडा वाढला. राहिला प्रश्न ताप,थंडी,न्यूमोनिया तर कोव्हिडं काळात ब्लड प्रेशर,हृदयरोग,किडनी,एड्स,कॅन्सर,अर्धांगवायू,अपघाती मृत्यू, डेंग्यू, मलेरिया,यासह अनेक रोग जे वर्षभर असतात व त्यातून माणसे दगावतात हे रोग अचानक गायब कसे झाले ?? हे कोणी सांगू शकेल? मृत्यू जणू काय कोरोना मुळे होतोय असे कृत्रिम भासवून जनतेला वेठीस धरण्यात आले आहे. ?? लोक नेमके मृत्युमुखी कसे पडत होते? एकीकडे कोव्हिडं वर निदान व औषध नाही हे सांगण्यात येते तर मग पेशंट सोबत हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नेमके झिम्मा खेळत होते का? रेमडीसीवर सारखी इंजेक्शन नको असताना 4 -4 डोस दिल्यावर धीपाड मनुष्य सुद्धा लयाला लागतो.मृत्युमुखी पडणारे जास्त वृद्ध , त्याखालोखाल 45 ते 55 त्याखालोखाल 30 ते 40.कोरोना जर प्रतिकार शक्ती कमी होणाऱ्याला होतो तर लहान मुले का मेली नाहीत ? ते तर सर्वात कमी प्रतिकार शक्तीची असतात.कोव्हिडं काळात थंडी ताप खोकला ज्यांनी घरात अंगावर बरे केले आहेत ते आज ठणठणीत आहेत.जे टीव्ही पाहून हॉस्पिटल मध्ये भरती झाले ते मात्र आज आपल्यात नाहीत.
भारतात कोरोना नाही तर हे एवढे मृत्यूचे तांडव कशासाठी? जगतिक आरोग्य संघटना संस्थेला धरून चिन सारखे राष्ट्र जगाला वेठीस धरू पाहत आहे.??वर्षभरात जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची सदस्य असणारी राष्ट्रे सर्वात जास्त कोरोना ची शिकार झाली आहेत.ज्यांनी who चे सदस्यत्व सोडले त्यात अचानक कोरोना कमी झाले.कोरोना तपासणी किट पासून ते सर्व प्रोटोकॉल हे who ने सांगितल्या प्रमाणे आहेत. भारताने who चे सदस्यत्व सोडले तर कोरोना व्यतिरिक्त जो काही व्यापार भारताशी निगडित आहे तो सुद्धा बंद करावा लागला असता. ज्यात इतर रोग व त्यासाठी लागणारी उपकरणे यासह भारतात तयार होणारी औषधे ज्याला जगभरात अब्जावधी ची मागणी आहे ती बंद करावी लागली असती. त्यामुळे खूप विचारांती भारताने who नुसार कोरोना टेस्ट व उपचार प्रारंभ केला.यात सर्व नेते व जबाबदार व्यक्तीना मोठे घबाड देऊन तोंड बंद ठेवा याबाबत सुद्धा उपक्रम करण्यात आले आहेत. who ने तर इतकी मोठी मृत्यूची लाट का आणावी ?आत्ताची युद्धे कोणत्याच देशात व एकंदरीत मानवजातीला न परवडणारी आहेत.प्रत्येक देश अण्वस्त्र धारी आहे.कोरोना हा एकप्रकारे रसायन युद्धाचा प्रकार आहे ज्यात चीन हे अति नालायक राष्ट्र प्रगतीपथावर आहे.वसाहत वाढवणे, आर्थिक उत्पन्न वाढवणे व जगावर एकतर्फी दबदबा राखणे हा तिहेरी उद्देश चीन चा आहे.अमेरिका वरवर जरी चीन विरुद्ध बोलत असले तरी त्यांचेही यात लागेबांधे आहेत.इस्त्रायल सारखा देश सगळ्या विरुद्ध लढू शकतो मात्र who संस्थेच्या सदस्य असल्याने तो ही या प्रकरणात शांत आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीचे फक्त तोंड दाखवून त्यांना जाळले जाते.त्यांचे अवयव तस्करी चे खूप मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट who ला हाताशी धरुन काम करते.?? यात मोठमोठे बुद्धिवादी अथवा तथाकथित डावे व पुरोगामी आंदोलनकारी यांनाही पॅकेज पोचले गेले आहे.??
मास्क,सेनेटायझर, लॉक डाऊन यामुळे कोरोना नियंत्रित येतो का? मुळात कोरोना चेन तुटली असल्याने याची गरज नाही.नेते लोकांना याची कल्पना असल्याने विना घाबरता लाखोंच्या सभा,निवडणूक दौरे सुरू आहेत.बाकी सारे नियम साधारण लोकांना.? भीतीचे वातावरण खोटे आहे? बिलकुल,प्रसार माध्यमे ज्यांना करोडो रु.देऊन हव्या तशा बातम्या देण्याचे काम करणारी यंत्रणा आपल्या व इतर देशात आहे.मुळात भारत देश चालवण्याची ताकद प्रसार माध्यमात आहे.नेते हव्या तशा बातम्या लावून सामान्य जनतेच्या मनात हवे तसे वातावरण निर्माण करतात व आपले काम साधतात. याविरुद्ध कोण बोलेल,लिहिलं त्याला संपवले जाते नाहीतर विकत घेतले जाते.वरवर सरळमार्गी दिसणारे हे जग आतल्या बाजूनी इतके घातक आहे हे न समजणारे कोडे च आहे. ? शेअर मार्केट ढासळले, उद्योगधंदे बंद झाले,जनता असंतुष्ट आहे,देशाची वाट लागली आणि तरीही कोरोना खोटा म्हणताय हे कसे? पूर्वी सारे नेते व वरिष्ठ कोरोना ला ओरिजनल घाबरली.मात्र,एप्रिल 2020 नंतर मात्र या हायर औथोरिटी सह सर्वाना कोरोना म्हणजे केवळ लोकांना घाबरून स्वतःचा स्वार्थ साधने एवढेच उरले.? देश भिकेला लागला तर जगभरात उत्तर देश सुद्धा याच अवस्थेत असल्याने तितकाचा फरक पडणार नाही. अवयव तस्करी रॅकेट आणि who ची मोठी पॅकेजेस अगदी साधारण मंत्री व शासकीय लोकांना पोहोचते झालीत.? कोणाला देशाचे काही पडले नाही.उलट देश कोरोना मुक्त ठेवला असता तर आपल्या देशाला अनेक नुकसान सोसावी लागली असती जी लाॅकडाऊन पेक्षा भयानक आहेत.
मग लस तर खरी आहे का ? कोरोना ची लस आदर पुनावाला यांनी 2020 च्या एप्रिल ला करोडो डोस स्वतःच्या खिशातल्या पैशातून बनऊन ठेवले आहेत.पटत नसेल तर 2020 च्या मे मधल्या त्यांच्या मुलाखती पहा.बाबा रामदेव यांनी आणलेले औषध पोलीस बळाचा वापर करून का दाबले हे विचारायचे धाडस कोणी का केले नाही? उघड आहे की लस सुद्धा सर्व नेते व हायर औथोरिटी ना अब्जो रु.मिळवून देणार होती. मात्र,who नुसार इतक्यात ती देणे फायदेशीर नव्हते.लस प्रतिकार शक्ती वाढवणारी असू शकते.मात्र ती तब्बल 12 महिने उशिरा आपल्याला देत आहेत इथेच कोरोना च्या सत्य – असत्या बद्धल सर्वात मोठा पुरावा आहे. मग आत्ता लस देण्यास इतके राजकारण का? : उघड आहे की लोक कोरोना ला घाबरायचे बंद झाले होते.आजही लोकांची लस घ्यायची मनस्थिती नाही.who चे घबाड पूर्ण भरले आहे आता लस उत्पादन करणाऱ्या लोकांना पुरेपूर फायदा मिळून देण्यात जो तो तत्पर विचार सुरू आहे. एवढी जर लोकांची काळजी असेल तर प्रत्येक मेडिकल मध्ये लस पोहोचती करा.ज्याला हवी तो घेईल. रेमडीसीवर इंजेक्शन 5 ते 10 हजाराला गोर गरीब घेत होते.खेडे गावातील मेडिकल सुद्धा लाखो चा गल्ला मिळवत होते.अगदी बाळंतपण हॉस्पिटल सुद्धा कोरोना हॉस्पिटल मध्ये बदलले लोकांनी. आता लस घ्यायला वय आणि सरकारी लालफित कशाला.2 हजार जरी दर लावला तर घेणारा घेईल .पण,शासन आज ना उद्या पोलीस बळ वापरुन घराघरात घुसून लस देणार ही आमची भविष्यवाणी आहे.या लसीचा फायदा तोटा काळ ठरवेल मात्र 100% लसीकरण होत नाही तोवर लॉक डाऊन आणि निर्बंध हटणार नाहीत.ही आंदोलने, जनतेचा विरोध व्हावा यासाठीच हे निर्बंध आहेत.लोकांनी रागाने का होईना लस द्या म्हणावे हा उद्देश.?? मग लस घ्यावी का नको? आज ना उद्या घरात घुसून शासन लस देणार आहे त्यामुळे तुमच्या हातात एक तर लस घ्या नाहीतर लॉक डाऊन आणि निबऀध स्वीकारा एवढेच आहे. हि प्रश्न उत्तरे खोटी आहेत असे कोणाला वाटले तर आम्हाला याची उत्तरे सुद्धा द्या.एकवेळ आमचा अभ्यास,संशोधन खोटे असू शकतील?? उपस्थित प्रश्नांची जी उत्तरे दिली आहेत ती खोटे कशी असू शकतील?