कोरोना पॉलिसीवर सुप्रीम कोर्टाकडून केंद्राची कानउघडणी
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १ जून.. २०२१:- सुप्रीम कोर्टाने आज कोरोनासंबंधी मुद्द्यांवर सुनावणी केली. यावेळी कोर्टाने लशींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाची मते- देशात सर्वत्र लशीची एकच किंमत असण्याची आवश्यकता.अनेक गावात इंटरनेट नसल्याने कोविड ऍपवर नोंदणीसाठी […]
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210214-WA0008-5-11.jpg)
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १ जून.. २०२१:-
सुप्रीम कोर्टाने आज कोरोनासंबंधी मुद्द्यांवर सुनावणी केली. यावेळी कोर्टाने लशींच्या वेगवेगळ्या किंमतीबाबत प्रश्न उपस्थित केले.
सुप्रीम कोर्टाची मते- देशात सर्वत्र लशीची एकच किंमत असण्याची आवश्यकता.अनेक गावात इंटरनेट नसल्याने कोविड ऍपवर नोंदणीसाठी पर्याय काय ?
नव्या नियमांच्या अभावामुळे संकट वाढू शकते.
सरकारने नवी पॉलिसी आणावी.लसींची किंमत केंद्र सरकार ठरवतं आणि उर्वरित खासगी रुग्णालयांना दिलं जात आहे. याचा आधार काय आहे?
यावर्षीच्या शेवटापर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस मिळण्याची आशा आहे.
सुप्रीम कोर्टाचे तीन न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, एलएन राव आणि एस रविंद्र भट यांच्या बँचने केंद्र सरकारला अनेक मुद्द्यांवर वेठीस धरत फटकारले असून नवी पॉलिसी आणण्याचे सांगितले आहे.