कोरोना काळात दुकानदारी बंद?? गरीबांची दुरावस्था??
मुंबई / प्रतिनिधी चक्रधर मेश्राम
दि. ३ एप्रिल २०२१
कोरोनाचे उगमस्थान व्यापाऱ्यांचे दुकान आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे 7 वाजता सर्व व्यवसाय बंद झाले पाहीजे बाकी सर्व सुरळीत चालू असले तरी काहीही फरक पडत नाही…??
अजब प्रशासन गजब निर्णय…??
ST बसेस पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. काही ठिकाणी रेल्वे,विमान सुरू आहेत
सगळे सरकारी कार्यालये सुरू आहेत . लग्न कार्य धुमधडाक्यात आहेत..राजकीय सभा मोर्चे मिटींगा जोरात…?? शोषल डिस्टन्स…दुकानदार ? मास्क घालणे ….दुकानदार ?सॅनिटायजर….दुकानदार?
गर्दी नको…दुकानदार?कार्यवाही…दुकानदार?
दंड…दुकानदार?
अधिकारी वर्गाची अरेरावी…??दुकानदार ये बंद कर रे.दुकानदार
याच्यावर कार्यवाही करा रे…दुकानदार (व्यापारी) बिचारा मुका….बहिरा…आंधळा…सगळे रोल प्ले करतो…त्याचा कोणीही वाली नाही…??
तो इन्कम टॅक्स भरतो, तो सेल्स टॅक्स भरतो, तो अकृषक कर भरतो, तो नपचे सर्व कर भरतो
तो दुकांनचे भाडे भरतो, तो लाईट बील भरतो,तो बँकेचं व्याज भरतो तो त्याचे कर्मचारी जगवतो
तो नौकराच्या सर्व सुख दुःखात सर्वोतोपरी सहभागी असतो
तो सर्वांची काळजी घेतो…
त्याची अडचणीच्या काळात सर्वच लोकांना आठवण येते तेथे सुदधा माणुसकीच्या नात्याने तो फुल नाही फुलाची पाकळी घेऊन उभा राहतो…तरी सुद्धा प्रशासनाच्या कोणत्याही कार्यवाहीला धीट पणे सामोरे जातो…कारण त्याची बाजू ऐकून व समजून घेणारे कोणीही नाहीत…?? म्हणून मुका बिचारा रोज बुक्क्यांचा मार सहन करतो… 7 वाजता बंद करा…
दुकाना पुढे चौकोन करा.. केले
डिस्टन्स मेंटन करा.. केले
दंडाची पावती फाडा.. फाडली…
असा हा मनुष्य प्राणी… व्यापारी दुकानदार … व्यापार वाचवा देश वाचवा