महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते २७ जैन संघटनांचा सत्कार

Summary

मुंबई, दि. 30 : कोरोना काळात मानवसेवा तसेच जीवदयेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बोरीवली मुंबई येथील 27 जैन संघटनांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बोरिवलीचे आमदार सुनील राणे, जैन संघांचे […]

मुंबई, दि. 30 : कोरोना काळात मानवसेवा तसेच जीवदयेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बोरीवली मुंबई येथील 27 जैन संघटनांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला बोरिवलीचे आमदार सुनील राणे, जैन संघांचे समन्वयक स्नेहल शाह, नगरसेवक प्रवीण शाह व बिनाबेन दोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

जैन समाजाचे अर्थव्यवस्था, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय सेवा व सेवा क्षेत्रांत फार मोठे योगदान आहे. भगवान महावीरांनी दिलेल्या करुणेच्या शिकवणीचे पालन करीत जैन संघटनांनी अन्नधान्य वाटप, पांजरापोळ येथे मदत, मास्क वाटप, आदी समाजोपयोगी कार्य करून कोरोनाला पराभूत करण्यासाठी मदत केली, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

जैन साधू संतांनी धर्म जागृतीचे कार्य केले त्याप्रमाणे जैन संघटनांनी करोना विषयक सुरक्षित आचरणाबाबत जनजागृती करून कोरोनाची तिसरी लाट येणार नाही या दृष्टीने कार्य करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

यावेळी 27 जैन संघटनांच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चेतन शाह, दिलीपभाई शाह, बकुलभाई शाह, हितेंन्द्र शाह, नवरत्न संघवी, दिनेश शाह, हितेश शाह, हिरेन शेठ, रमेशभाई जैन, चंद्रकांत दोषी, रमेशकुमार शाह, हितेंन्द्र मोखीया, अशोक शाह, किरीटभाई मणीयार, मनिष तातेड,  धिरजलाल शाह, जिग्नेश शाह, जितेंन्द्र शाह, राजुभाई वोरा, सुशांत शाह, किरीट शाह, सुरेश लखाणी, रमेशभाई सांघवी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *