महाराष्ट्र हेडलाइन

कोरोना ….. उस्मानाबादच्या रेड झोनला जबाबदार कोण ? राजकीय पक्षाच्या आंदोलनाला बंदी घाला… आंदोलनात फिजिकल डिस्टनचा अभाव.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 7 जून 2021:- कोरोना महामारीमुळे गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण लॉक असलेला उस्मानाबाद जिल्हा सोमवार दि. ७ जून पासून अंशतः अनलॉक होत आहे. सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सर्व दुकाने सुरु होणार आहेत. हॉटेल, […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 7 जून 2021:-
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड महिन्यापासून पूर्ण लॉक असलेला उस्मानाबाद जिल्हा सोमवार दि. ७ जून पासून अंशतः अनलॉक होत आहे. सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सर्व दुकाने सुरु होणार आहेत. हॉटेल, बार देखील सुरु होणार आहेत. लालपरी म्हणजे एस.टी .ची चाके धावणार आहेत. आजवर लोक अडकून पडले होते आता मोठ्या संख्यने बाहेर पडतील. मात्र अनलॉक झाल्यानंतर पुन्हा लॉक करण्याची वेळ येणार नाही, याची खबरदारी सर्वानी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ८९२ कोरोना रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५२ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १२७२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९०० झाली आहे.सर्वाधिक मृत्यू एप्रिल- मे महिन्यात झाले आहेत. दररोज २० च्या पुढे मृत्यूचा आकडा होता. त्यावेळी मृत्यूचे आकडे लपवण्यात आले. खऱ्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. अनेक जिवाभावाची माणसे गेली. ज्याचा कर्ता माणूस गेला, त्याच्या घरी काय दुःख आहे, हे त्यालाच माहित. कोरोना झाल्यानंतर बरे होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कितीही पैसे मोजायला तयार असलेला माणूस ५० रुपयांचा चांगला मास्क आणि ५० रुपयाची सॅनिटायझर बाटली असे १०० रुपये खर्च करण्यासाठी मागे – पुढे पाहतो. सार्वजिनक ठिकाणी जाताना तोंडावर मास्क असलाच पाहिजे. खिशात सॅनिटायझरची छोटी बाटली ठेवलीच पाहिजे आणि सोशल डिस्टिंसिंग पाळलेच पाहिजे. कोरोनाची साखळी कायम तुटलीच पाहिजे.
कोरोनामुळे मागील वर्षी शाळा- महाविद्यालय सुरु होवू शकले नाहीत. त्यामुळे दहावी- बारावीची परीक्षा सुद्धा होवू शकलेली नाही. यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. घरात बसून विद्यार्थी देखील कंटाळले आहेत. शाळा कधी सुरु होतें, याची वाट ते पाहात आहेत. अनेक विद्यार्थांनी गेले वर्षभर हातात पुस्तकच धरलेले नाही. ऑनलाइन शिक्षण विद्यार्थाना पचनी पडत नाही. कोरोना नष्ट झाला तरच शाळा सुरु होतील.
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत. ज्यांचा व्यवसाय भाड्याच्या जागेत सुरु आहे, त्याचे भाडे चुकलेले नाही आणि व्यवसाय काहीच नाही. अनेकांना दुकाने कायमची बंद करावी लागली. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना काम नाही. एकंदरीत अर्थव्यवस्थेचा गाडा रुतून बसला आहे, तो सुरळीत केव्हा होणार,याचे उत्तर कुणाकडे नाही. आंदोलनाला बंदी घाला .
खरं तर कोरोना पसरवण्यात सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा मोठा वाटा आहे. राज्यातील विरोधी पक्ष राज्य सरकार विरुद्ध आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष केंद्र सरकारविरुद्ध कोरोना काळातही आंदोलन करताना पहावयास मिळाले. आता जरा कोरोना कमी झाला तर आंदोलनाची तयारी सुरु आहे. बरं , या आंदोलनामुळे सत्ताधारी पक्षावर काडीचाही परिणाम होत नाही. आंदोलनात सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा उडालेला असतो. यामुळे यांना कोरोना घेरतो आणि त्यांच्यामुळे इतरांना घेरतो.सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याची खुर्चीसाठी चालू असलेली लढाई जनतेच्या मुळावर उठू नये. त्यासाठी आंदोलनाला एक वर्षे तरी बंदी घाला. उस्मानाबाद जिल्हा अजूनही रेड झोन मध्ये आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दर ७.७० आहे. जिल्हा ग्रीन झोन मध्ये येण्यासाठी प्रत्येकाला जबाबदाराचे भान हवे. बेभान होणाऱ्याला कायद्याचा बडगा दाखवायला हवा. तरच आपला उस्मानाबाद जिल्हा ‘ब्रेक द चेन’ होईल. असे स्पष्ट मत सुनील ढेपे
(उस्मानाबाद लाइव्ह) यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *