कोरोना आजाराच्या सावटात इतर जीवघेण्या आजारावरती प्रशासनाचे जाणून दुर्लक्ष
Summary
एकीकडे संसर्गजन्य आजार कोरोना चे रुग्ण कमी होताना दिसत आहेत, सोबतच आलेला पाऊस साचलेले पाणी विल्हेवाटीसाठी तुंबलेल्या नाल्या, तुटलेल्या नाल्या इत्यादी सर्वांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. साचलेल्या पाण्यामध्ये तयार होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावाने *डेंगू, मलेरिया* यासारखे आजार डोके वर काढताना […]
एकीकडे संसर्गजन्य आजार कोरोना चे रुग्ण कमी होताना दिसत आहेत, सोबतच आलेला पाऊस साचलेले पाणी विल्हेवाटीसाठी तुंबलेल्या नाल्या, तुटलेल्या नाल्या इत्यादी सर्वांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
साचलेल्या पाण्यामध्ये तयार होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावाने *डेंगू, मलेरिया* यासारखे आजार डोके वर काढताना दिसत आहेत परंतु त्याकडे जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कुठल्याही उपाय योजने शिवाय व नियोजन शून्य, ढसाळ प्रशासन सर्वांच्या जीवाशी खेळताना दिसतो आहे. दिवसागणिक डुकरांच्या वावराने देखील परिसरातील शहरातील नागरिक असुरक्षित असून त्यापासून होणाऱ्या मेंदूज्वर व इतर आजारांच्या सावटात सर्वसाधारण नागरिक जगत आहेत. प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन या सर्व समस्यावर तोडगा काढावा.
नियमित जंतूनाशक फवारणी, डुकरांचा बंदोबस्त, नाली बांधणी व पाण्याची विल्हेवाट इत्यादी लवकरात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे तरी ते लवकरात लवकर अमलात आणावे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर