कोरोनामुळे मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यांना IIT-JEE NEET चे मोफत शिक्षण Education point चा स्तुत्य उपक्रम.
चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 28 मे:-
मागील वर्षापासून करोना ने अक्षरशः सर्वच ठिकाणी हाहाकार माजवलेला आहे, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना सुद्धा गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च कोण करणार हा प्रश्न त्यांना पडलेला आहे व शिक्षणाला मुकावे लागणार .
बल्लारपूर येथे असणारे Education Point Ballarpur यांनी सामाजिक बांधिलकी पोटी पालकत्व गमावलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेऊन IIT-JEE व NEET ( इंजिनीरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा ) चे संपूर्ण दोन वर्षाचे शिक्षण मोफत देऊन त्यांची संपूर्ण तयारी करवून देण्यात येईल. ज्यांनी आपले पालक गमाविले अश्या होतकरू विद्यार्थ्यांचे दुःख समजून त्यांचे शिक्षण करणार आहेत. Education Point Ballarpur चे कार्यालय AXIS बँक च्या वरती ,जुनी दिलीप टॉकीज येथे कार्यरत आहेत अधिक माहिती करिता दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
गिरडकार सर
703069044
ठाकरे सर 7030690033
खणके सर 7020736693
यांचेकडे नोंदणी करावी.