BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाच्या नावाखाली सरपंचाने साथीदारांना घेऊन केली नागरिकांची लूट??

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २१ एप्रिल २०२१ कोरोनाने महाराष्ट्रातील जनतेला हैराण करून सोडले. छोटे…धंदे,व्यवसाय बंद करून टाकले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजी.. रोटी मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या वतीने फक्त पोकळ बाता केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र जनतेला काय… कसे… […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २१ एप्रिल २०२१
कोरोनाने महाराष्ट्रातील जनतेला हैराण करून सोडले. छोटे…धंदे,व्यवसाय बंद करून टाकले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजी.. रोटी मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या वतीने फक्त पोकळ बाता केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र जनतेला काय… कसे… किती मिळते याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष चौकशी आराखडा तयार करण्यात यावा. जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी सुरू झाली. त्यामुळे जनतेला काही कामानिमित्त बाहेर पडणे शक्य नाही.. संचारबंदी सुरू होताच संधीचे सोने करून घेण्यासाठी आरमोरी येथुन जवळच असलेल्या जोगीसाखरा.. आणि त्या मार्गाने पुढे महत्त्वाचे कामासाठी मार्गभ्रमण करणाऱ्या नागरिकांना अडवून मास्कच्या नावाखाली दंड म्हणून पैसे वसुलीचा जबरदस्तीने लुटारू गोरखधंदा सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. कोणत्याही प्रकारच्या दंडात्मक वसुलीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते ठराव मंजूर केले पाहिजे.. तसेच जाहीर सुचना देणे आवश्यक आहे. तसे न करता जोगीसाखरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही सहकाऱ्यांनी हातात लाकडी दंडा घेऊन महत्त्वाचे कामानिमित्त ये… जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मास्क च्या नावाखाली पैसे मागणी केली आहे. या प्रकारच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासना विरोधात नैराश्य पसरले आहे.. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या जोगीसाखरा येथील सरपंच यांच्या या नव्या धंद्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *