कोराडी कॉलोनी येथे आज जागतिक योग दिवस साजरा
आज 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कोराडी कॉलोनी येथील क्लब नंबर 2 मध्ये किरण भांडारकर, हर्षा शर्मा व प्रिया चुतर यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन वेगवेगळ्या आसनंबद्ध करून साजरा करण्यात आला. तसेच विद्यामंदिर शाळेच्या परिसरात अनुजा मॅडम च्या उपस्थितीत योग वर्ग घेण्यात आला.महजेनकोचे सोहनी साहेब – DYCE कासुलकर साहेब – DYCE इंगळे साहेब -SE यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यक्रमात सारिका नंदनवार , ज्योती जाधव , श्वेता टोंगे, शामकला मोहितकर, प्रतिभा पाटील, प्रतीमा बोडे, प्रतिभा रंधे,कविता गजभिये, पल्लवी भालेराव, वैशाली पारधी, कल्पना वनकर, रुपाली मुळे, मीना खडलेवाल, नीलिमा ढोरे, पूनम खोब्रागडे, विशाखा निकोसे, विद्या वडसकर ,स्वाती चांदेकर,कविता रामटेके, शीतल पानतावणे, संध्या रंगारी, नेहा बघे ,मनीषा बागडे, ममता गणवीर, जया उरकुडे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला के टी पी एस कोराडी कॉलनी मधील रहिवासी यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.