कोंढाळी हर घर जल’ योजनेबाबत संभ्रम जल जीवन मिशन योजना जमीनीतच गाडून ठेवलेली आहे लाभार्थ्यांना नळजोड तसेच मार्ग दुरूस्ती चा प्रश्न
Summary
कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे भारत सरकारच्या संकल्पनेतील ‘हर घर जल’ योजनेत पाइपलाइन अर्धवट असून, या पाइपलाइनद्वारे नळजोडसाठी निधी नसल्याने योजनेला घरघर लागली असल्याचे चित्र सध्या काटोल तालुक्यातील कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजनेचेआहे. कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजने साठी1106.38लक्ष रुपयांचा निधी मा.अनिल […]

कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे
भारत सरकारच्या संकल्पनेतील ‘हर घर जल’ योजनेत पाइपलाइन अर्धवट असून, या पाइपलाइनद्वारे नळजोडसाठी निधी नसल्याने योजनेला घरघर लागली असल्याचे चित्र सध्या काटोल तालुक्यातील कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजनेचेआहे.
कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजने साठी1106.38लक्ष रुपयांचा निधी मा.अनिल बाबू देशमुख यांनी या योजनेसाठी शासनाकडून मंजूर करून घेतला होता. मात्र या योजनेच्या मध्यमातून दिड वर्ष
लोटूननही प्रत्यक्ष ग्रामस्थांना पाणी कधी मिळणार याकडे कोंढाळी करांचे लक्ष लागले आहे.
कोंढाळी येथील सुधारित पाणीपुरवठा योनेच्या माध्यमातून कोंढाळी नगरीतील ८५% भागात जलवाहिनी घातल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाणी योजना पूर्णत्वास गेली असती तर किमान प्यायला पाणी मिळाले असते अशी भावना शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
‘जलजीवन’ मिशन
या योजनेसाठी केवळ पाइपलाइनसाठी निधीची तरतूद असून वैयक्तीक नळ जोड देण्यासाठी यामध्ये कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे या योजनेबाबत नगर पंचायत प्रशासन व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम पसरला आहे. पाण्याची लाइन होत असतानाच सोबतच कनेक्शन मिळावे, अशी मागणी नगर पंचायतीच्या नागरिकांन मधून होत आहे.
*पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या*
काटोल तालुक्यातील जाम नदी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु अनेकदा ही योजना नादुरुस्त झाल्याने नागरिकांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही. अशावेळी या ठिकाणी जलजीवन मिशनचे काम गुणवत्ता पुर्ण व तातडीने नळजोड करण्याची मागणी नागरिकांनी व शेतकरी करत आहेत.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून कोंढाळी साठी नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी नळजोड देण्यासाठी निधीची तरतूद नाही ही बाब आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तरी ग्रामपंचायतीने आधी पाइपलाइन पूर्ण करून घ्याव्यात नंतर नळजोड साठी जिल्हा नियोजन समिती यांचे मार्फत निधी मंजूर झाल्यावर ते काम करू.
असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगत आहेत.
कोंढाळी ग्राम पंचायतीचे 21जून 2023पासून दर्जोन्नत होऊन नगर पंचायत बनली आहे. कोंढाळी ग्राम पंचायत असतांनाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा नागपूर यांच्या देखरेखीखाली जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत -कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजना 17डिसेंबर 2021ला प्रशासकीय मान्यता मिळाली, तसेच 23नव्हेंबर 2021मधे तांत्रिक मान्यता मिळाली होती.तर 01जून2022रोजी कार्यादेश मिळाला. कोंढाळी सुधारित पाणीपुरवठा योजना कर्यादेशापासून काम पुर्ण करण्यासाठी 12महिन्याचा अवधी देण्यात आला होता. मात्र दिड वर्ष लोटून नही , या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे माध्यमातून टाकण्यात आलेल्या जलवाहिनी मधून अजूनही घरो घरी नळ जोडणी झाली नाही हे विशेष!खरे तर
जलजीवन मिशनच्या माध्यमातून होणारी पाणी पुरवठा योजना ही साधारणपणे यापुढे ३० ते ३५ वर्षांचा विचार करून होत असून एकदा पाइपलाइन झाली आणि यानंतर कनेक्शन देण्यासाठी ती पुन्हा खोदावी लागली तर साधारणपणे कोंढाळी मध्ये 3800ते 3900 नळजोड करावी लागणार आहेत. अशा वेळी एवढ्या ठिकाणी ती पाइपलाइन खोदावी लागेल व यातून मोठ्या प्रमाणावर पाइप फुटण्याच्या शक्यता आहे व यामुळे योजना जरी नवीन असली तरी सुरू होण्यापूर्वीच दुरुस्तीतून खिळखिळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाइपलाइनच्या टिकाऊ क्षमतेबाबत चिंता वाटते. तरी शासनाने पाइपलाइन सोबतच वैयक्तिक नळ जोड देत वेळी खोदलेला सिमेंट रस्ता खोदून दिले ते सिमेंट मार्ग पुन्हा बांधून देण्यास लागणारा निधी पाणीपुरवठा योजनेचे माध्यमातून देण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्याच प्रमाणे नळ जोड प्रसंगी संपुर्ण नगरपंचायत भागातील सर्व रस्ते खोदकाम करून जागोजागी खड्डेच खड्डे पडतील. या करीता नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा नळ जोड नंतर नादुरुस्त सडक/ रस्ते यांचे दुरुस्ती चा नीधी ही याजोनेच्या माध्यमातून
न मिळाल्यास नगर पंचायत भागातील सध्याचे सिमेंट मार्ग/रस्त्यांची दुरावस्थावे साठी नीधीची जुळवाजुळव कोणत्या खात्यातून करावा हा महत् प्रश्न नवगठित नगरपंचायती प्रशासना समोर उभा ठाकला आहे.
–
अशी माहिती कोंढाळी नगरपंचायत प्रशासक धनंजय बोरीकर यांनी सांगितले आहे.
*एक कोटी 80लाख मंजूर*
*एक कोटी ८० लाख मंजूर*
शुद्ध-स्वच्छ पेयजल योजनेंतर्गत प्रत्येक घरातील नळ कनेक्शन देण्यासाठी विकास निधी अपुरा होता. या साठी येथील जन प्रतिनिधी केशवराव धुर्वे, स्वप्नील व्यास, संजय राऊत, कमलेश गुप्ता व गटाच्या पदाधिकार्यांनी काटोलचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर ही बाब ठेवली. आमदार अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासोबत बैठक घेऊन कोंढाळी जल जीवन मिशन योजनेसाठी नळ जोडणीसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा बांधकाम निधी मंजूर करवून घेतला असून हा निधी नागपूर जिल्हा परिषदेच्या पेयजल विभागाला देण्यात आला आहे. .
दरम्यान, कोंढाळी ग्रामपंचायती चे नगर पंचायतीमध्ये दर्जोन्नत करण्यात आली आहे. येथील पिण्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी ही आता नगर पंचायत प्रशासनाची आहे. परंतु जल जीवन मिशन योजनेंतर्गत जोडण्यात येणाऱ्या नळजोडण्यांचा निधी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नगर पंचायत कोंढाळी कडे वर्ग करण्यात आल्यास जेणेकरून नळ जोडणीच्या कामाला गती मिळू शकेल. याबाबत नागपूर जिल्हा परिषद पेयजल विभागाचे अधिकारी बावणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोंढाळी जल जीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला कनेक्शन जोडण्यासाठी जिल्हा विकास कार्यालयाकडून धनादेश प्राप्त झाला असून, तो धनादेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा अडे सुपूर्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभाग.
जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अभियंता झोडपे यांचे भ्रमणध्वनी वर संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही…..
सध्या कोंढाळी जल जीवन मिशन योजनांची जल वाहिण्या जमिनीच गाडून आहे. या जल वाहिण्या मधून घरो घरी नळजोडणी केली जाणार होती. मात्र कोंढाळी जलजीव मिशन योजनां अद्यापही जमिनीतच गाडूण ठेवली आहे. नीधी उपलब्ध असुनही नळ जोडणी अजूनही झाली नाही. सामोर पुन्हा पावसाळा सुरु झाला की घरो घरी नळजोडणी चे काम परत रखडणार व आक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते ही गाडून ठेवलेली योजना क्रियान्वित तरी होईल काय?असा सवाल कोंढाळीकर करत आहेत.