हेडलाइन

कोंढाळी वनपरिक्षेत्र मुख्यालयी मुलभूत व पायाभूत सोई सवलतींचा आभाव

Summary

कोंढाळी वनपरिक्षेत्र मुख्यालयी मुलभूत व पायाभूत सोई सवलतींचा आभाव कोंढाळी-प्रतिनिधि नागपुर वन विभागातील सर्वात जुने कोंढाळी वनपरिक्षेत्र चे गत वैभव लयास जात असून नागपुर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे वनपरिक्षेत्र म्हणून ओळखले जात होते.मात्र मागील अनेक वर्षांपासून गतवैभव प्राप्त कोंढाळी वनपरिक्षेत्र […]

कोंढाळी वनपरिक्षेत्र मुख्यालयी मुलभूत व पायाभूत सोई सवलतींचा आभाव

कोंढाळी-प्रतिनिधि

नागपुर वन विभागातील सर्वात जुने कोंढाळी वनपरिक्षेत्र चे गत वैभव लयास जात असून नागपुर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे वनपरिक्षेत्र म्हणून ओळखले जात होते.मात्र मागील अनेक वर्षांपासून गतवैभव प्राप्त कोंढाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाला उतरीकळा लागल्यात जमा आहे.

येथील जुने वन व उप अधीकारी ,तसेच वन रक्षक कार्यालयाचे नुतनीकरण करण्याची मागणी स्थानिय जनप्रतिनीधींनी या भागातील आमदार व माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांचे माध्यमातून वन विभागाकडे केली होती, या वरून अधीकारी उपवन अधिकारी ,व पाच वन रक्षक निवासांचे नुतनी करन करून देण्यात आले आहे. मात्र येथील उपवन परिक्षेत्र अधिकारी व वन रक्षक यांचे निवास खोल्यांना वीज,पाणी व अन्य मुलभूत गरजा अजूनही पुर्ण झाल्या नाहीत, येथील विहीरीचे पाणी पिण्या योग्य नाही तर 25वर्ष जुनी विंधन विहीर(बोअरवेल) जलसत्रोता आभावी सध्या बंद पडली आहे, येथील 109वर्ष जुने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मोडकळीस आले असून ते ही पडक्या अवस्थेत अवशेष रूपाने उभे आहे. या जुन्या व मोडकळीस आलेली इमारत व जुनी वन कोठडी डिसमेंटल करने फारच गरजे चे आहे, सोबतच या वनपरिक्षेत्र परिसरातील पाणीपुरवठ्याची विंधन विहीरी सह अंतर्गत पाईपलाईन ही बसविने गरजे असून येथील मुलभूत व पायाभूत सोई सवलती झाल्यास कोंढाळी वनपरिक्षेत्रातील अधीकारी व कर्मचारी मुख्यालयी राहू शकतात.

कोट्यावधी चे लाकूड आगार ही सुरक्षा कुंपणाचे प्रतिक्षेत असून येथील रोपवाटीकेचे व वन कर्मचारी निवास पुर्णतः मोडकळीस आले आहे.

कोंढाळी वनपरिक्षेत्र संवेदनशील

नागपुर विभागातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील वन्यजीव व शेड्यूल अ (एक)मधे येणारे वन्यप्राण्याचे सुरक्षा व देखरेख करण्या साठी वन रक्षक व वन अधिकारी मुख्यालयी असने गरजे चे असून त्या करीता त्यांचे निवासस्थानी मुलभूत व पायाभूत सोयी सवलती करने गरजेचे असल्याची मागणी नागपुर जि प चे मेटपांजरा जि प सर्कल चे जि प सदस्य सलील देशमुख, माजी जि प सदस्य रामदास मरकाम बिहालगोंदी सरपंच मरकाम यांनी वन संरक्षक नागपुर , व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांचे कडे केली आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी वन जन योजना

कोंढाळी वनपरिक्षेत्राचे अंतर्गत मेटपांजरा जि प सर्कल चे सदस्य सलील देशमुख यांनी येथील जंगल लगतचे 32गावांकरिता श्यामाप्रसाद मुखर्जी वन जन योजने च्या अनेक योजना वन मंत्री यांचे कडून मंजूर घेऊन त्या करीता आराखडे बनविण्याचे प्रक्रियेला 2020व2021या वर्षात सुरूवात करण्यात आली होती सध्या या योजनेला वन विभाग यांचे कडून सुरू करण्यात यावी अशी मागणी ही स्थानिक जनप्रतिधीनींची आहे.

येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अपुर्ण बांधकामा बाबद वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अनेक आवश्यक (मुलभूत) कामाचे पुर्तता करण्या साठी वन विभागाचे वरिष्ठ कार्यालया कडे कामाचे प्रांकलन पाठविण्यात आले आहे, त्या प्रांकलनाला मंजुरी मिळाल्यावर च येथील आवश्यक गरजा पुर्ण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *