कोंढाळी ला शरद पवारांचे जंगी स्वागत
Summary
कोंढाळी -प्रतिनिधी दुर्गा प्रसाद पांडे राष्ट्रवादी काँग्रेस कृषि पदवीधर संवाद बैठक आज अमरावतीत होणार आहे. त्यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख नागपूर विमानतळावरून अमरावती कडे जातांना २३एप्रील रोजी दुपारी बारा […]
कोंढाळी -प्रतिनिधी
दुर्गा प्रसाद पांडे
राष्ट्रवादी काँग्रेस कृषि पदवीधर संवाद बैठक आज अमरावतीत होणार आहे. त्यापुर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच राज्याचे माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख नागपूर विमानतळावरून अमरावती कडे जातांना २३एप्रील रोजी दुपारी बारा वाजता कोंढाळी येथील कोंढाळी वर्धा टी पांईट वर शरद पवार यांचे ग्रामपंचायत कोंढाळी व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष चे वतीने जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस घ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिस फौजफाटा व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी कोंढाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व ज्येष्ठ सदस्यांनी, काटोल पंचायत समिती चे सभापती उप सभापती, नागपूर जिल्हा परिषदेचे आजी माजी जि प सदस्य सोबतच काटोल -नरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकार्यांनी तसेच कोंढाळी लगतच्या ग्राम पंचायतींच्या सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व सहकार क्षेत्रातील पदाधिकार्यांनी ही या प्रसंगी जंगी स्वागत केले.

